Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » देशाच्या ख्रिस्तीकरणास मदर टेरेसाच जबाबदार

देशाच्या ख्रिस्तीकरणास मदर टेरेसाच जबाबदार

=योगी आदित्यनाथ यांचा आरोप=
yogi adityanath 3बस्ती, [२० जून] – भारताचे ख्रिश्तीकरण करण्याचे आजवर जे प्रयत्न झाले आणि जे कट रचण्यात आले, त्या कटात नोबेल विजेत्या मदर टेरेसा यांचाही मोठा सहभाग होता, असा थेट आरोप भाजपाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय आणि नागालंड यासारख्या राज्यांसह ईशान्य भागांमध्ये हिंदूंना ख्रिश्‍चन धर्मात आणण्यासाठी मिशनर्‍यांनी व्यापक चळवळ उभी केली होती. देशाचे खिस्तीकरण करण्याचा कटच रचण्यात आला होता आणि यात मदर टेरेसा यांचाही सहभाग होता, असे गोरखपूरचे खासदार असलेले आदित्यनाथ यांनी येथे आयोजित राम कथा कार्यक्रमात बोलताना सांगितले.
ईशान्य भारतात किती भीषण स्थिती आहे, याची जाणीव तुमच्यापैकी अनेकांना नाही. सत्यता जाणून घेण्यासाठी ईशान्य राज्यांना एकदा तरी भेट द्यायला हवी, असे सांगताना त्यांनी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दाही उपस्थित केला. राम मंदिर उभारण्यापासून हिंदूंना कुणीही रोखू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28658

Posted by on Jun 21 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (214 of 2453 articles)


=४८ तासांची उलटगणती सुरू= बंगळुरू, [२० जून] - एकाचवेळी २० उपग्रह अंतराळात पाठविण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो सज्ज ...

×