Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » देशातील पहिले आयुर्वेदिक रिसर्च सेंटर नवी मुंबईत

देशातील पहिले आयुर्वेदिक रिसर्च सेंटर नवी मुंबईत

Ayurvedic research centre inaugrationनवी मुंबई, [२९ डिसेंबर] – नवी मुंबईतील खारघरमध्ये देशातील पहिले रिसर्च सेंटर उभे राहणार आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे हे रिसर्च सेंटर उभारण्यात येणार आहे. आज या रिसर्च सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
या रिसर्च सेंटरसोबत एक रूग्णालयही उभारण्यात येणार आहे. यात आयुर्वेदिकसह यूनानी औषधांवरही संशोधन केलं जाणार आहे. खारघर सेक्टरमध्ये तीन मजली हे रिसर्च सेंटर आणि रूग्णालय उभे राहणार आहेत. सिडकोच्या माध्यमातून येणार्‍या वर्षात या इमारतीचे काम पूर्ण केले जाणार. क्षेत्रीय होमियोपॅथी अनुसंधान संस्थानच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी केंद्र सरकार ३० कोटी खर्च करणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26305

Posted by on Dec 29 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (975 of 2452 articles)


सोनियांचे वडील फॅसिस्ट नेहरूंमुळेच निर्माण झाली काश्मीर, सियाचिन समस्या सरदार पटेलांवर स्तुतिसुमने मुंबई, [२८ डिसेंबर] - कॉंग्रेस पक्ष आज ...

×