Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » देशात कुठेही असहिष्णुता नाही: अरुण जेटली

देशात कुठेही असहिष्णुता नाही: अरुण जेटली

=जागतिक मंदीतही भारतीय अर्थव्यवस्था गतिमान=
Arun Jaitley3दुबई, [१७ नोव्हेंबर] – संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या सावटात असताना आणि अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेची घसरगुंडी सुरू असताना, भारतीय अर्थव्यवस्था मात्र या प्रतिकूल स्थितीतही पुढे वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे केले.
सोमवारी सायंकाळी येथे भारतीय व्यावसायिकांच्या बैठकीला संबोधित करताना जेटली म्हणाले की, आधीच्या काळात जागतिक आर्थिक संकट १० ते १५ वर्षांच्या काळात एकदाच आपला प्रभाव दाखवत असे. पण, आता तर हे संकट नित्याचेच झाले आहे. असे असतानाही, भारतीय अर्थव्यवस्था मात्र आपले मार्गक्रमण करीत आहे. जेटली संयुक्त अरब अमिरातच्या दोन दिवसीय भेटीवर आले आहेत.
भारत सरकारने आर्थिक विकासाचा आपला परिपूर्ण अजेंडा तयार केला आहे. महत्त्वाचे क्षेत्र गुंतवणुकीसाठी खुले केले आहेत. जागतिक आर्थिक मंदीचे चटके आम्हालाही जाणवत आहेत. त्यातच यावर्षी मान्सूननेही दगा दिला आहे. अशा प्रतिकूल स्थितीत प्रत्येकच गोष्ट सुरळीत चालेल, अशी अपेक्षा करता येणार नाही. पण, भारतीय अर्थव्यवस्था यातही आपला मार्ग शोधून पुढे वाटचाल करीत आहे, असे जेटली यांनी सांगितले.
या जागतिक मंदीचा सर्वात मोठा फटका आमच्या निर्यातीला बसला आहे. पण, त्यातूनही सावरण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. आमच्याकडे अतिरिक्त मनुष्यबळ आहे. त्यांनी जगभरात भारताचा मानसन्मान वाढवला आहे. हीच आमची खरी शक्ती आहे, असेही ते म्हणाले.
असहिष्णुता हे वास्तव नाही
भारतात सर्वत्र असहिष्णुता निर्माण झाली असल्याचे चित्र रेखाटण्यात आले आहे. पण, सत्यता अशी आहे की, भारतात कुठेही असहिष्णुतेची स्थिती नाही. देशात मी केवळ सलोख्याचेच चित्र पाहिले आहे. यामुळेच मी अगदी सुरुवातीलाच ही स्थिती म्हणजे काही लोकांची निर्मिती असल्याचे म्हटले होते, असेही जेटली यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25518

Posted by on Nov 18 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1227 of 2458 articles)


इसिसचे कमांड सेंटर उद्‌ध्वस्त शस्त्रागारात स्फोटांची मालिका पॅरिस, [१७ नोव्हेंबर] - पॅरिस हल्ल्याचा बदला घेण्यासाठी फ्रान्सच्या हवाई दलाने आज ...

×