Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » देश सोडण्याचा विचारही नाही

देश सोडण्याचा विचारही नाही

=भारतीय असल्याचा अभिमान : आमिर खानला उपरती=
amir khanमुंबई, [२५ नोव्हेंबर] – असहिष्णुतेमुळे भारत सोडण्याची इच्छा माझ्या पत्नीने व्यक्त केली, असे वक्तव्य करणार्‍या अभिनेता आमिर खानने आज बुधवारी चक्क, आपण भारतीय असल्याचा आणि भारतात जन्म घेतल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे स्पष्ट करून, देश सोडून जाण्याचा विचारही आपल्या मनात नसल्याचे स्पष्ट केले.
भाजपा आणि केंद्र सरकारसोबतच, देशभरातील मान्यवरांनी आमिरच्या वक्तव्याचा निषेध केला. अगदी हिंदी चित्रपट सृष्टीतील मंडळीही त्याच्याविरोधात गेल्यानंतर आमिरला एकाकी पडल्याची जाणीव झाली. याच अनुषंगाने आज बुधवारी त्याने एक निवेदन जारी करून आपली भूमिका विशद केली.
मी अगदी स्पष्ट करू इच्छितो की, जगात अतिशय सुंदर असलेला हा भारत देश सोडून जाण्याचा माझा किंवा माझ्या पत्नीचा विचारही नाही. भविष्यातही असा विचार माझ्या मनात येणार नाही. माझ्या भूमिकेला विरोध करणार्‍यांनी एकतर माझी मुलाखत पूर्णपणे पाहिली नसावी किंवा माझ्या वक्तव्याचा त्यांनी विपर्यास केला असावा, असे आमिर म्हणाला.
‘भारत हा माझा देश आहे आणि या देशावर माझे अपार प्रेम आहे. या देशात माझा जन्म झाला, हे मी माझे सौभाग्यच समजतो. आयुष्यात कधीच मी हा देश सोडून जाणार नाही. मी देशभक्त आहे आणि त्यासाठी मला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असे सांगताना आमिर म्हणाला की, मुलाखतीत मी जे काही बोललो, त्यावर मी ठाम आहे. या कठीण काळात ज्यांनी मला पाठिंबा दिला, त्यांचा मी आभारी आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25739

Posted by on Nov 26 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1149 of 2452 articles)


=तो आवाज हार्दिकचाच= अहमदाबाद, [२५ नोव्हेंबर] - पटेल समाजाच्या आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करताना राष्ट्रध्वज पायदळी तुडविणारा आणि पोलिसांना जिवे मारण्यासाठी ...

×