Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » धनादेश अनादरसंदर्भातील विधेयक राज्यसभेत पारित

धनादेश अनादरसंदर्भातील विधेयक राज्यसभेत पारित

नवी दिल्ली, [७ डिसेंबर] – धनादेश अनादर प्रकरणाचा निपटारा तातडीने करण्यासाठी आणण्यात आलेल्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट (सुधारित) विधेयक आज राज्यसभेत पारित करण्यात आले. यामुळे धनादेश अनादर प्रकरणाच्या न्यायालयीन कारवाईत गुंतलेल्या देशातील हजारो लोकांना दिलासा मिळाला आहे.
यासंदर्भातील विधेयक लोकसभेने अर्थसंकल्पीय अधिवेशनात आधीच पारित केले होते. मात्र, राज्यसभेत हे विधेयक पारित होऊ शकले नव्हते. त्यामुळे सरकारला पुन्हा अध्यादेश काढावा लागला होता. राज्यसभेत आज यासंदर्भातील विधेयक पारित झाल्यामुळे याचे कायद्यात रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विधेयकामुळे आता धनादेश अनादर प्रकरणाचा गुन्हा धनादेश ज्याठिकाणी वटण्यासाठी दिला होता, त्याठिकाणीच दाखल करता येणार आहे. आतापर्यंत धनादेश अनादरित झाल्यानंतर तो ज्याठिकाणाहून देण्यात आला होता, त्याच ठिकाणी गुन्हा दाखल करता येत होता.
राज्यसभेत आज यासंदर्भातील प्रलंबित विधेयक विरोधकांनी पारित होऊ दिल्यामुळे भूमी अधिग्रहण आणि जीएसटीसह अन्य अनेक प्रलंबित विधेयकेही पारित होण्याची सरकारची आशा बळावली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26028

Posted by on Dec 8 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1070 of 2453 articles)


मतभेद विसरून शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहा तूर डाळ प्रकरणी पारदर्शी कारवाई कायदा व सुव्यवस्था संदर्भात सभागृहात उत्तर देणार नागपूर, ...

×