Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » धार्मिक धुव्रीकरणाचा कॉंग्रेसचा प्रयत्न

धार्मिक धुव्रीकरणाचा कॉंग्रेसचा प्रयत्न

=सोनिया, राहुलने भूमिका स्पष्ट करावी : शाहनवाज हुसेन यांची मागणी=
Shahnawaz-Hussain11नवी दिल्ली, [१९ नोव्हेंबर] – कॉंग्रेस देशात सांप्रदायिक ध्रुवीकरणाचे वातावरण तयार करत आहे, असा आरोप भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सय्यद शाहनवाज हुसेन यांनी केला असून, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.
भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत हुसेन म्हणाले की, याचाच एक भाग म्हणून माजी परराष्ट्र मंत्री सल्मान खुर्शीद, माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते शकिल अहमद यांच्यासारखे नेते बेताल विधाने करत देशातील जातीय सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो, त्याला कोणताही धर्म नसतो आणि गुन्हेगारावर त्याने केलेला गुन्हा पाहून देशाच्या घटनेनुसार कारवाई केली जात असते, त्याचा धर्म आणि संप्रदाय पाहून नव्हे. मात्र, असे असताना शकिल अहमदसारखे नेते देशातील सांप्रदायिक वातावरण बिघडवण्यासह, देशात तणाव निर्माण होईल, अशी विधाने करत आहे.
शकिल अहमद आणि अन्य कॉंग्रेस नेते करत असलेली विधाने दुर्दैवी असून, त्यांच्या विधानाशी आपण सहमत आहे की नाही, हे कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट करावे, अशी मागणीही हुसेन यांनी केली.
राहुल गांधी यांनी आज रा. स्व. संघाबाबत केलेल्या विधानावर तीव्र हरकत घेत हुसेन म्हणाले की, राहुल गांधी यांच्या अनुमतीनेच शकिल शहमद आणि इतर नेते बोलत आहे, हे आज राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरून स्पष्ट झाले आहे. या सर्वांना देेशात सांप्रदायिक ध्रुवीकरणाचे वातावरण निर्माण करायचे आहे. रा. स्व. संघ ही सांस्कृतिक, देशाच्या मातीवर प्रेम करणार्‍या निखळ राष्ट्रभक्तांची संघटना आहे, अशा संघटनेची सिमीशी तुलना करण्याबाबतचे राहुल गांधींचे विधान दुर्दैवी आहे. अशा विधानातून राहुल गांधी यांची मानसिकता दिसून येते. भाजपा अशा विधानाची कठोर निंदा करते, असेही ते म्हणाले.
देशाची अर्थव्यवस्था चुकीच्या दिशेने जात असल्याच्या माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या विधानावर घणाघाती हल्ला चढवताना हुसेन म्हणाले की, डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था फक्त भ्रष्टाचाराच्या दिशेने जात होती, आज ती प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
नितीशकुमार उद्या शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांच्या कार्यकाळात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती सुधारेल आणि राज्याची प्रगतीच्या दिशेने वाटचाल होईल, अशी आम्हाला आशा असल्याचे हुसेन यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना देण्यात आलेली भारतरत्न पदवी काढून घेण्यात यावी, अशी मागणी काही भाजपा नेत्यांनी केली असली तरी ती भाजपाची अधिकृत भूमिका नाही, असे स्पष्ट करत हुसेन म्हणाले की, ती त्या नेत्याची व्यक्तिगत भूमिका आहे. देशाचे नागरिक म्हणून आपल्या भावना ते व्यक्त करत आहेत. आपल्या देशात लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे.
नथुराम गोडसे महात्मा गांधींचे हत्यारे आहेत, महात्मा गांधींची हत्या करून त्यांनी मोठा अपराध केला, ही भाजपाची भूमिका आहे. भाजपा महात्मा गांधींच्या आदर्शाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे हुसेन यांनी एका प्रश्‍नावर स्पष्ट केले.
संपुआच्या कार्यकाळातील सर्व घोटाळ्यांची चौकशी सुरू आहे, त्यामुळे आपली चौकशी करण्याबाबत राहुल गांधी यांनी आव्हान देऊ नये. योग्यवेळी या घोटाळ्यातील सर्व दोषींवर कारवाई केली जाईल, कितीही मोठा माणूस असला तरी तो सुटणार नाही, असे हुसेन यांनी एका प्रश्‍नावर स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25573

Posted by on Nov 19 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1206 of 2453 articles)


हैदराबाद, [१९ नोव्हेंबर] - केंद्र सरकारने लागू केलेल्या वन रँक वन पेन्शन योजनेच्या विरोधात माजी सैनिकांनी सन्मान परत करणे किंवा ...

×