Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » नरेंद्र मोदींची जादू कायम

नरेंद्र मोदींची जादू कायम

  • ७४ टक्के लोकांची पसंती
  • सर्वेक्षणाचा निष्कर्ष
  • ‘अच्छे दिन’ येत असल्याचे निरीक्षण

narendramodi-pmनवी दिल्ली, [३ डिसेंबर] – दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा अजून कायम आहे. ही बाब नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ७४ टक्के लोकांनी मोदींना पसंती दिली असून, त्यांंच्या नेतृत्वात देशात ‘अच्छे दिन’ येत असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे.
मिंट आणि इंस्टावाणीद्वारे बिहार निवडणुकीचे निकाल आल्यानंतर ही जनमत चाचणी केली आहे. मोदींकडून लोकांना असलेल्या अपेक्षा अजून कायम आहेत हेच यावरून सिद्ध होत असल्याचे जैन युनिव्हर्सिटी सेंटर फॉर रीसर्च इन सोशल सायसेन्स ऍण्ड एज्युकेशनचे संचालक संदीप शास्त्री यांनी सांगितले. मजबूत पर्यायाचा अभाव असल्याने मोदींचे एवढे उच्च मानांकन असू शकते, असेही मत त्यांनी नोंदविले.
याच वर्षी ऑगस्ट महिन्यात ७९ आणि गत वर्षी ऑगस्ट महिन्यात ८२ टक्के लोकांची पसंती राहिलेल्या मोदींची लोकप्रियता काहीशी कमी झाली आहे. २०१४ च्या मे महिन्यात जेव्हा नरेंद्र मोदी यांनी देशाची सत्ता सांभाळली, तेव्हा त्यांच्या लोकप्रियतेचे मानांकन ७४ टक्केच होते. लोकांमध्ये थोडीफार गोंधळाची स्थिती आहे, तरीही मोदींची लोकप्रियता अजूनही शिखरावर असल्याचे शास्त्री म्हणाले.
मोदी सरकारच्या कामकाजावर मोहोर
सर्वेक्षणात सहभागी एकूण लोकांपैकी ७० टक्के लोकांनी मोदींच्या नेतृत्वातील रालोआ सरकारला देखील पसंत केले आहे. मोदींच्या लोकप्रियतेत मेट्रो शहरे आणि नॉन-मेट्रो शहरात किरकोळ फरक आहे. महानगरांमधील ७३ टक्के आणि तुलनेने लहान शहरांमधील ७५ टक्के लोकांनी मोदींनाच आपली पसंती असल्याचे म्हटले, तर महानगरांमधील ६१ आणि इतर शहरांमधील ७२ टक्के लोकांनी मोदी सरकारच्या कामकाजाची स्तुती केली.
‘अच्छे दिन’वरही शिक्कामोर्तब
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आश्‍वासन दिल्याप्रमाणे अच्छे दिनच्या प्रश्‍नावर महानगरांमधील ५५ टक्के आणि इतर शहरांमधील ९९ टक्केलोकांनी अच्छे दिनचे वचन पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार योग्य दिशेने चालत असल्यावर शिक्कामार्तब केले. याशिवाय आर्थिक सुधारणांच्या दिशेने उचलल्या जाणार्‍या सरकारच्या पावलांना महानगरांमधील ६३ आणि इतर शहरांमधील ६८ टक्के लोकांनी योग्य ठरविले आहे.
मिंट आणि इंस्टावाणीच्या या सर्वेक्षणात महानगरे आणि इतर शहरांमधील ११०६ लोकांची मते जाणून घेण्यात आली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25969

Posted by on Dec 4 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1090 of 2453 articles)


=एस ऍण्ड पीचा अंदाज= नवी दिल्ली, [३ डिसेंबर] - २०१५-१६ या चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ७.४ टक्के ...

×