richwood
richwood
richwood
Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » नव्याने सार्वमत घ्या

नव्याने सार्वमत घ्या

=१० लाख ब्रिटनवासीयांची मागणी=
Britain_Flag1लंडन, [२५ जून] – युरोपियन समूहातून बाहेर पडणार्‍या ऐतिहासिक सार्वमताचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या चोवीस तासांतच सुमारे १० लाख ब्रिटनवासीयांनी युरोपियन समूहात राहाण्याबाबत देशवासीयांचा कौल जाणून घेण्यासाठी नव्याने सार्वमत घेण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका सादर केली आहे.
सुमारे १० लाख नागरिकांची स्वाक्षरी असलेले निवेदन पंतप्रधान कार्यालयाने ब्रिटिश संसदेकडे पाठविले असून, संसदेत या मुद्यावर आता सविस्तर चर्चा होणार आहे. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये कोणत्याही महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी एक लाख स्वाक्षर्‍या असलेले निवेदन येणे आवश्यक असते.
ब्रिटनने युरोपियन समूहात राहायचे की नाही, या मुद्यावर गुरुवारी सार्वमत घेण्यात आले होते. या बलाढ्य समूहातून बाहेर पडण्याच्या बाजूने ५१.९० टक्के नागरिकांनी, तर, ४८.१० टक्के नागरिकांनी विरोधात मतदान केले होते. या निर्णयामुळे नाराज झालेल्या ब्रिटनवासीयांनी शुक्रवारी सायंकाळपासूनच नव्याने सार्वमत घेण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली होती. आज सकाळपर्यंत दहा लाखांचा आकडा गाठण्यात आला. लंडन, ब्रायटन, ऑक्सफर्ड, केम्ब्रिज आणि मँचेस्टर यासारख्या प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ब्रिटनने युरोपियन समूहातच कायम राहाण्याच्या समर्थनार्थ स्वाक्षरी केली आहे.
ब्रिटनला तत्काळ बाहेर करण्याची मागणी
दरम्यान, युरोपियन समूहातून बाहेर पडण्याच्या बाजूनेच ब्रिटनवासीयांनी कौल दिला असल्याने या देशाला समूहातून तत्काळ बाहेर करण्यात यावे, अशी जोरदार मागणी संस्थापक देशांनी केली आहे. ब्रिटनने आपला नवा पंतप्रधान शक्य तितक्या लवकर निवडावा आणि युरोपियन समूहातून बाहेर पडण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी भूमिका फ्रान्सने मांडली आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28798

Posted by on 4:19 am. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google