Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » नितीशची मुखिया होण्याचीही लायकी नाही: तस्लिमुद्दिन

नितीशची मुखिया होण्याचीही लायकी नाही: तस्लिमुद्दिन

=राजद, जदयुमध्ये घमासान=
taslimuddin rjdपाटणा, [२१ मे] – बिहारमधील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावरून जदयु आणि राजद या सत्तारूढ आघाडीतील सहकारी पक्षांमध्येच घमासान सुरू झाले असून, नितीश कुमार पंतप्रधान तर दूरच, मुखिया होण्याच्या लायकीचेही नाहीत, अशा शब्दात लालूप्रसाद यांचे विश्‍वासू व राजदचे खासदार तस्लिमुद्दिन यांनी घरचा अहेर दिला.
एवढेच नव्हे तर ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावरून नितीश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीच तस्लिमुद्दिन यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राजद-जदयु महाआघाडी याच क्षणी तुटावी, अशीच माझी इच्छा आहे. परंतु, हा लालूंचा निर्णय आहे, असे तस्लिमुद्दिन म्हणाले.
यापूर्वी राजद नेते रघुवंशप्रसादसिंह यांनीदेखील दारूबंदीच्या मुद्यावरून नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला होता. बिहारमध्ये दारूबंदीच्या निर्णयाचा नितीश कुमार खूप गाजावाजा करीत आहेत. परंतु, इतकी वर्षे त्यांनी दारू का विकली, याचे उत्तर द्यावे, अशी मागणी रघुवंश यांंनी केली. दरम्यान, राजदच्या संसदीय पक्षाच्या बैठकीतही नितीश कुमार यांना विरोध झाल्याचे वृत्त आहे. बाहुबली शहाबुद्दिन तुरुंगात लोकांना भेट होता तेव्हा पोलिस अधिकारी काय करत होते, असा सवाल माजी खासदार प्रभुनाथसिंह यांनी उपस्थित केला.
तस्लिमुद्दिन, रघुवंश यांना पक्षातून काढा : जदयु
आता पाणी डोक्यावरून जाण्याची वेळ आली असल्याने राजदने तस्लिमुद्दिन आणि रघुवंश प्रसादसिंह यांच्यासारख्या नेत्यांना तात्काळ पक्षातून काढून टाकावे. अन्यथा जदयु-राजद यांच्यातील संबंध आणखी ताणले जातील, असा इशारा जदयु नेते संजय सिंह यांनी दिला आहे. आमच्या दृष्टीने राजद म्हणजे लालू, राबडी व तेजस्वी आहे. रघुवंशसिंह किंवा तस्लिमुद्दिन नव्हे, असे जदयुचे सरचिटणीस श्याम रजक यांनी स्पष्ट केले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28387

Posted by on May 22 2016. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (297 of 2449 articles)


=तीन तासांत शिजतो भात= जैसलमेर, [२१ मे] - संपूर्ण उत्तर भारतात सध्या उष्णतेची लाट आली असताना राजस्थानाच्या जैसलमेर जिल्ह्यातील भारत-पाक ...

×