Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » नितीश सरकार २ वर्षांपेक्षा अधिक टिकणे अशक्य

नितीश सरकार २ वर्षांपेक्षा अधिक टिकणे अशक्य

=रामविलास पासवान यांचा दावा=
ramvilas paswan4पाटणा, [३० नोव्हेंबर] – बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे सरकार २ वर्षांपेक्षा अधिक काळ चालणार नाही आणि बिहारमध्ये मध्यावधी निवडणूक होणे निश्‍चित असल्याचा दावा लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी केला आहे.
नितीश यांच्या नेतृत्वात महाआघाडीचे सरकार दीड किंवा दोन वर्षांपेक्षा अधिक टिकू शकणार नाही, कारण लालू आणि नितीश यांच्यात वर्चस्वावरून वाद सुरू होतील, असे विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीच्या समीक्षा बैठकीत पासवान बोलत होते.
महाआघाडीने जाती कार्ड खेळले आहे, परंतु हे सरकार दीर्घकाळापर्यंत चालणार नाही. नितीश यांच्या नेतृत्वातील महाआघाडीत संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेस सामील आहेत. लालू प्रसाद यांच्या राजद सर्वात मोठा पक्ष असून नेते असलेल्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा संजद दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे दोघांमध्ये वर्चस्वाची लढाई होणार असून तीच समस्या राहणार असल्याकडे पासवान यांनी लक्ष वेधले.
पासवान यांचा लोजपा, केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोकसमता पक्ष आणि जितनराम मांझी यांचा हिंदुस्थानी अवाम मोर्चा भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआत सामील होते. विधानसभा निवडणुकीत रालोआला केवळ ५८ जागा मिळाल्या. ज्यात ५३ जागा भाजपाला, ४० जागांवर निवडणूक लढवणार्‍या लोजपला फक्त २, तसेच रालोसपा २ आणि १ जागा हम या पक्षाला मिळाली.
पासवान यांचा लहान भाऊ आणि राज्य लोजपा अध्यक्ष पशुपतीकुमार पारस, पासवान यांचे दोन जावई, पुतण्या आणि एक जवळचा नातेवाईक देखील निवडणुकीत पराभूत झालेत. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य राहिले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25872

Posted by on Nov 30 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1107 of 2449 articles)


=बीएसएफच्या हेड कॉन्स्टेबलसह दोघांना अटक= नवी दिल्ली, [२९ नोव्हेंबर] - उत्तरप्रदेशच्या एटीएसने दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानी आयएसआयच्या हस्तकाला अटक केल्यानंतर दिल्ली ...

×