Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » नेहरू-गांधी घराण्यामुळेच विकास रखडला

नेहरू-गांधी घराण्यामुळेच विकास रखडला

=भाजपाध्यक्षांची तोफ=
rajnathSinghकाकोरी, [१३ ऑगस्ट] – तब्बल ६० वर्षे केवळ एकाच घराण्याने देशावर राज्य केले असल्याने स्वातंत्र्यापासून देशाचा पाहिजे तसा विकास होऊ शकला नाही, अशी तोफ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज शनिवारी येथे डागली. केवळ भाजपाच या देशाचा विकास करू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशाच्या विकासासाठी राज्यांचा विकास होणे आवश्यक आहे. पण, सर्वाधिक काळ देशावर राज्य करणार्‍या एकाच घराण्याने राज्यांचा विकासच होऊ दिला नाही. त्यामुळे देशाचा विकासही रखडला. भाजपाप्रणित रालोआ सरकार २०१४ मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी कॉंगे्रसप्रणित संपुआ सरकारने सलग दहा वर्षे राज्य केले. पण, या काळातही देश विकासापासून वंचितच राहिला, असे अमित शाह म्हणाले.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर देशासाठी प्राणाहुती देणार्‍या जवानांना मानवंदना देण्यासाठी आयोजित ‘याद करो कुर्बानी’ कार्यक्रमाचा भाग म्हणून काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत ते बोलत होते.
मला सांगताना खरोखरच वेदना होत आहेत की, देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली. यातील ६० वर्षे एकट्या कॉंगे्रसने राज्य केले. पण, या सरकारने विकासच केला नसल्याचे परिणाम आपल्या सर्वांसमोर आहे, असे सांगताना, केवळ भाजपाच देशाचा सर्वांगिण विकास करू शकतो, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29203

Posted by on Aug 14 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (121 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१३ ऑगस्ट] - स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी राजधानी दिल्लीत यावर्षी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी दहशतवाद्यांनी दिल्लीत बॉम्बस्फोट ...

×