richwood
richwood
richwood
Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » नोटबंदी यशस्वीच : डॉ. नरेंद्र जाधव

नोटबंदी यशस्वीच : डॉ. नरेंद्र जाधव

-भविष्यात काळा पैसा शोधण्याचा मार्ग प्रशस्त,
नवी दिल्ली, २ सप्टेंबर –
नोटाबंदी अपयशी ठरल्याचा दावा नाकारताना खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी काळ्या पैशाचा पत्ता सरकारला प्रथमच सापडल्याने भविष्यात तो शोधण्याचा मार्ग प्रशस्त झाल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.
पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू असलेल्या जाधव यांना मोदी सरकारने सुमारे वर्षभरापूर्वी राष्ट्रपतीनियुक्तखासदार केले आहे. अर्थतज्ज्ञ डॉ. जाधव म्हणाले की, पाचशे व एक हजार रुपयांच्या रद्दबातल केलेल्या जवळपास ९९ टक्के नोटा परत आल्याने नोटाबंदी अपयशी ठरल्याचा शोध काही जणांनी लावला आहे. त्यामागे राजकीय हेतू आहे. पण एक अर्थतज्ज्ञ नात्याने मी सांगतो की, नोटाबंदी अजिबात अपयशी ठरली नाही. ९९ टक्के रक्कम परत येण्याचा एकच अर्थ आहे, की गोरगरीबांच्या नावावर आपला काळा पैसा जमा करण्यात करचोरांना, भ्रष्टाचार्‍यांना यश आले असेल, पण आजपर्यंत गाद्यांखाली, तळघरांत आणि शौचालयांमध्ये दडविलेल्या काळ्या धनाचा पत्ता सरकारला प्रथमच सापडला आहे. आजपर्यंत त्याचा पत्ता कधी शोधला गेला नव्हता. संशयित काळ्या धनांची पक्की माहिती सरकारकडे उपलब्ध होणे ही फार मोठी सकारात्मक कामगिरी आहे. त्याच्या आधारे भविष्यात काळ्या धनाला शोधून काढता येईल, असे डॉ. जाधव म्हणाले.
नोटाबंदीमुळे नोटा छापण्यासाठी २१ हजार कोटींचा खर्च आल्याचा माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम् यांचा दावा खोटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नोटाबंदीचा वाढीव खर्च पाच हजार कोटी रुपयांहून कमी आल्याचे सांगताना डॉ. जाधव म्हणाले की, नोटाबंदीसारख्या दूरगामी निर्णयाकडे पाहताना सरकार अथवा रिझर्व्ह बँकेचा तात्कालिक नफा किंवा तोटा पाहायचा नसतो, तर अर्थव्यवस्थेवरील परिणाम तपासायचे असतात. नोटाबंदी राबविताना सर्वांनाच त्रास झाला. पण ते कष्ट आणि वेदना मागे पडल्यात. वाईट दिवस संपले आहेत.
नोटबंदीमुळे बनावट नोटांवर आणि त्यायोगे दहशतवाद्यांच्या वित्तपुरवठ्यांवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ झाल्याची टिप्पणी त्यांनी केली. हा सर्जिकल स्ट्राइकच आहे. पण तो पुरेसा नाही. त्यात सातत्य ठेवावे लागेल. कारण बनावट नोटा शोधण्याचा प्रकार म्हणजे चोर-पोलिसाचा खेळ असतो. आपल्या शत्रू-देशाच्या एक पाऊल पुढे राहणे गरजेचे असते, असे त्यांनी सांगितले.
डॉ. जाधव उपराष्ट्रपती निवडणुकीसाठीच्या भाजपा खासदारांच्या बैठकीत नुकतेच सहभागी झाले होते. डॉ. मनमोहनसिंग सरकारमध्ये ते नियोजन आयोगाचे सदस्य व नंतर सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य होते.
नोटाबंदी ही कायदेशीर लूट असल्याच्या माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या टीकेवर डॉ. जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. डॉ. सिंग माझे गुरू आहेत. मला त्यांच्याबद्दल नेहमीच आदर राहिला आहे, पण त्यांनी केलेली टीका ही मी पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या अर्थतज्ज्ञ मनमोहनसिगांची नव्हती. ते शब्द राजकीय मनमोहनसिंगांचे असल्याचे मला खेदाने नमूद करावे लागेल, असे ते म्हणाले.(वृत्तसंस्था)

Short URL: http://vrittabharati.in/?p=34875

Posted by on 8:27 pm. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google