Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » न्यायव्यवस्थेने लक्ष्मणरेषा ओळखावी

न्यायव्यवस्थेने लक्ष्मणरेषा ओळखावी

=अरुण जेटली यांची स्पष्ट भूमिका=
arun-jaitley2नवी दिल्ली, [१६ मे] – प्रशासकीय व्यवस्थेत अर्थात सरकारच्या कामकाजात न्यायपालिकेच्या वाढत्या हस्तक्षेपाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सोमवारी न्यायव्यवस्थेला स्वत:साठी लक्ष्मणरेषा तयार करण्याचा कठोर सल्ला दिला. जे निर्णय प्रशासकीय व्यवस्थेचा भाग आहेत, त्यात न्यायालयांनी हस्तक्षेप करायलाच नको, असेही जेटली यांनी स्पष्ट केले.
आपल्या देशात न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे, यात वाद नाही. पण, स्वातंत्र्याच्या नावाखाली पायाभूत सिद्धातांच्या अन्य पैलूंशी आम्ही तडजोड करू शकत नाही. भारतीय राज्यघटनेने न्यायपालिकेचे कार्य निर्धारित केले असून, त्यानुसारच न्यायालयांनी त्यांचे कार्य करावे, असे जेटली यांनी इंडियन वुमेन्स प्रेस क्लबतर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात सांगितले.
सरकारने घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेण्याचे अधिकार न्यायव्यवस्थेला आहेत. पण, जे निर्णय सरकारच्याच अखत्यारीतील असतात, त्यात न्यायालयांनी हस्तक्षेप करायलाच नको. मला असे वाटते की, सर्वच संस्थांनी स्वत:साठी लक्ष्मणरेषा तयार करायला हवी. यामुळे बर्‍याच समस्या सुटणे शक्य होईल. कारण, जे प्रशासकीय निर्णय असतात ते न्यायव्यवस्था घेऊ शकत नाही आणि जे न्यायालयीन निर्णय असतात ते प्रशासकीय व्यवस्था घेऊ शकत नाही, असे जेटली म्हणाले.
कार्यपालिका जेव्हा एखादा निर्णय घेते, तेव्हा त्यात उत्तरदायित्व असते. सरकारने एखादा निर्णय बदलविण्याची मागणी करण्याचा पर्याय नागरिकांना असतो. याशिवाय, अशा सरकारला मतदानाच्या माध्यमातून सत्तेवरून हटविण्याचा अधिकारही त्यांना असतो. विशेष म्हणजे, सरकारने घेतलेला एखादा निर्णय घटनाबाह्य असल्यास तो रद्द ठरविण्याचा अधिकार न्यायालयांना आहे. पण, न्यायालय जेव्हा प्रशासकीय निर्णय घेते, तेव्हा नागरिक आणि सरकारपुढे कुठलाही पर्याय नसतो. न्यायपालिका ही कार्यपालिकेची पर्यायी शाखा नाही, तसेच अमूक एखादा प्रशासकीय निर्णय आम्हीच घेणार, असेही ती म्हणू शकत नाही. कारण, जेव्हा तुम्ही (न्यायपालिका) असे करता, तेव्हा सरकारच्या निर्णयाबाबत नागरिकांपुढे उपलब्ध पर्यायांपैकी एकही पर्याय त्यांच्याकडे नसतो, असेही जेटली यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28285

Posted by on May 16 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (337 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१६ मे] - महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश यावर्षी एमएच-सीईटीद्वारेच करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचे राज्याचे उच्च ...

×