Home » ठळक बातम्या, प.महाराष्ट्र » पंकजावर टीका करणार्‍यांनी स्वत: काय केलं?

पंकजावर टीका करणार्‍यांनी स्वत: काय केलं?

=बाळासाहेब थोरात यांचा घरचा अहेर=
balasaheb thoratअहमदनगर, [१९ एप्रिल] – राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी काम केलं म्हणून सेल्फी घेतली. परंतु, पंकजावर टीका करणार्‍यांनी काय केलं, असे म्हणत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी स्वपक्षीयांना घरचा अहेर दिला.
पंकजा मुंडे तरुण व उत्साही मंत्री आहेत. त्यांनी काम केलं म्हणून सेल्फी काढली. परंतु, आपण काय करतोय् हे अगोदर बघा. पंकजा भर दुपारी उन्हात फिरत आहेत याकडे कोणाचे लक्ष गेले नाही, असे सांगून थोरातांनी पंकजा मुंडे यांनी जोरदार पाठराखण केली. पंकजा मुंडे यांच्यावर टीका करणार्‍यांनी आपल्या घरातील एसी बंद केलेत का, असा सवालही थोरात यांनी त्यांच्या टीकाकारांना केला आहे. पंकजा मुंडे यांनी दुष्काळग्रस्त भागात काढलेल्या सेल्फीवरून नवा वाद निर्माण झाला आहे.
बाळासाहेब थोरात यांनी पंकजा मुंडेंची पाठराखण केली असली तरी दुष्काळावर प्रभावी उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका केली. टँकर सुरू करण्यासाठी सरकारने जाचक अटी घातल्या आहेत. आमच्या काळात टँकरला प्राधान्य होते. मात्र, आताच्या अटींमुळे जनतेला पाणी मिळत नाही, असेही थोरात म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27908

Posted by on Apr 20 2016. Filed under ठळक बातम्या, प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, प.महाराष्ट्र (463 of 2451 articles)


नजमा हेपतुल्ला यांचा सवाल जी अन्न, पाणी देते ती आईच! नवी दिल्ली, [१९ एप्रिल] - ज्या भूमीत आपण जन्मतो, ...

×