Home » ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य » पंजाबच्या प्रभारीपदाचा कमलनाथ यांचा राजीनामा

पंजाबच्या प्रभारीपदाचा कमलनाथ यांचा राजीनामा

=कमलनाथांचा राजीनामा हा तर दंगलीतील सहभागाचा पुरावाच: भाजपा=
Kamal nathनवी दिल्ली, [१६ जून] – पंजाब प्रदेश कॉंग्रेसच्या प्रभारीपदाचा ज्येष्ठ कॉंग्रेस नेते कमलनाथ यांनी आज राजीनामा दिला. तीन दिवसांपूर्वीच कॉंग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनी कमलनाथ यांची पंजाबचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती.
कमलनाथ यांच्या १९८४ मधील शीखविरोधी दंगलीतील कथित सहभागाच्या मुद्यावरून वादळ निर्माण झाल्यानंतर राजीनामा देण्याचा निर्णय कमलनाथ यांना घ्यावा लागला. अकाली दल आणि अन्य पक्षांनी कमलनाथ यांच्या नियुक्तीवर तीव्र आक्षेप घेतला होता. कमलनाथ यांची नियुक्ती म्हणजे पंजाबमधील शीखविरोधी दंगलीतील पीडितांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा आरोप अकाली दलाने केला होता. विशेष म्हणजे पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे कॉंग्रेससाठी कमलनाथ यांची नियुक्ती अडचणीची झाली होती.
पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत जनतेचे लक्ष मूळ मुद्यावरून भटकू नये, तसेच कॉंग्रेसचे नुकसान होऊ नये म्हणून कमलनाथ यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आपले राजीनामापत्र त्यांनी तीन दिवसांपूर्वीच अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाठवले. सोनिया गांधी यांनी कमलनाथ यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
२००५ पर्यंत पंजाबमधील १९८४ च्या शीखविरोधी दंगलीतील माझ्या कथित सहभागाबद्दल कोणाची तक्रार नव्हती, कोणी तसा आरोपही माझ्यावर केला नव्हता, एवढेच नाही तर या दंगलीच्या चौकशीसाठी नियुक्त नानावटी आयोगानेही मला दोषमुक्त केले होते. मात्र राजकीय हेतूने काही जण या प्रकरणी खोडसाळ आरोप करत आहे, असे कमलनाथ यांनी आपल्या राजीनामापत्रात म्हटले आहे. कॉंग्रेस पंजाबमधील अंमली पदार्थाच्या व्यापाराला निवडणुकीतील प्रमुख मुद्दा करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अंमली पदार्थाच्या व्यापाराऐवजी पंजाबची निवडणूक पुन्हा शीखविरोधी दंगलीच्या मुद्यावर फिरू नये म्हणून कमलनाथ यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. कमलनाथ यांनी कॉंग्रेसच्या प्रभारीपदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताला कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी दुजोरा दिला आहे.
कमलनाथांचा राजीनामा हा तर दंगलीतील सहभागाचा पुरावाच : रिजिजू यांचा कॉंग्रेसला टोला
मुंबई, [१६ जून] – कॉंग्रेसचे सरचिटणीस व पंजाबचे प्रभारी कमलनाथ यांनी बुधवारी सोनिया गांधी यांना पत्र पाठवून पंजाबच्या प्रभारीपदावरून राजीनामा देणे म्हणजे १९८४ ची शीखविरोधी दंगल ही कॉंग्रेसनेच घडविल्याचा सबळ पुरावा असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी येथे व्यक्त केली आहे.
१९८४ च्या शीखविरोधी दंगलीतील कथित सहभागाचा मुद्दा अडचणीचा ठरत असल्यामुळेच कमलनाथ यांनी स्वत: पंजाबच्या प्रभारीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी सोनिया गांधी यांना पत्रातून केली होती. आपल्या राजीनाम्यानेे पक्षाला अनावश्यक प्रश्‍नांवर प्रतिवाद करण्याऐवजी प्रचारावर लक्ष केंद्रीत करता येईल, असा युक्तिवाद कमलनाथ यांनी केल्याच्या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना रिजिजू म्हणाले, कमलनाथ यांना पंजाबमध्ये प्रभारीपदावर नेमून कदाचित कॉंग्रेसला त्यांच्या चुकीची जाणीव झाली असेल.
१९८४ मधील शीखविरोधी दंगल ही कॉंग्रेसचा आणि त्यांच्या नेत्यांचा सुनियोजित कट होता याचा हा स्पष्ट पुरावा असल्याचेही ते पुढे म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28631

Posted by on Jun 17 2016. Filed under ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य (223 of 2452 articles)


नवी दिल्ली, [१६ जून] - एनएसजीत प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या भारताला न्यूझिलंडचे समर्थन मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या राजकीय दबावानंतर ...

×