richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » पंतप्रधान आजपासून रशिया दौर्‍यावर

पंतप्रधान आजपासून रशिया दौर्‍यावर

narendra modi19नवी दिल्ली, [२२ डिसेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या बुधवारी रशियाच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर रवाना होणार आहेत. भारत-रशिया वार्षिक परिषदेत सहभागी होतानाच ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यासोबत नागरी अणुऊर्जा, हायड्रोकार्बन, संरक्षण आणि व्यापार यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात दोन्ही देशांमधील विशेष सहकार्याचे संबंध आणखी विस्तारित करण्यावर चर्चा करणार आहेत.
दोन्ही नेत्यांमध्ये गुुरुवारी चर्चेच्या काही फेर्‍या होणार आहेत. यानंतर अणुऊर्जा आणि संरक्षणासह काही महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात येणार आहेत, अशी माहिती परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पत्रकारांना दिली.
दोन्ही देशांनी व्यापार व आर्थिक सहकार्यातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांचे वरिष्ठ नेते २००० पासून सातत्याने मॉस्को आणि नवी दिल्ली येथे चर्चा करीत आहेत. भारत आणि रशिया नेहमीच एकमेकांचे खरे मित्र राहिले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या या दौर्‍यामुळे हे संबंध आणखी मजबूत होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26274

Posted by on 2:42 pm. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google