richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » पंतप्रधान तोयबाच्या निशाण्यावर

पंतप्रधान तोयबाच्या निशाण्यावर

=संसद भवन, लष्करी मुख्यालयावरही हल्ल्याची योजना=
narandra Modi-6नवी दिल्ली, [२९ डिसेंबर] – पाकधार्जिण्या लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यासोबतच संसद भवन, लष्करी मुख्यालय आणि देशातील अणुकेंद्रावरही मोठा हल्ला करण्याची धाडसी योजना तयार केली आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थांनी आज मंगळवारी याबाबतचा इशारा जारी केला आहे.
नव्या वर्षात भारतातील सर्वच राज्यांमध्ये आत्मघाती हल्ले करण्याची तोयबाची योजना तयार झाली आहे. भारतात सर्वत्र नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असल्याने आणि अनेक देशांमधील पर्यटकही यासाठी भारतात आले असल्याने आपला कुटील डाव तडीस नेण्यासाठी तोयबाने १५ ते २० अतिरेक्यांचा गट तयार केला असून, त्यांना त्यासाठीचे विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे, असे गुप्तचर सूत्रांनी म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अतिरेक्यांचा हा गट प्रशिक्षण घेतल्यानंतर भारत-पाक सीमेवरील पाकी सैनिकांच्या छावण्यांपर्यंत पोहोचला आहे. ते एकतर घुसखोरीच्या तयारीत असावेत, किंवा काही अतिरेक्यांनी घुसखोरी केली असावी, अशी शक्यताही सूत्राने वर्तविली आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26332

Posted by on 10:46 pm. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google