Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » पंतप्रधान पॅरिसला रवाना

पंतप्रधान पॅरिसला रवाना

=वातावरण बदलावरील परिषदेत सहभागी होणार=
Modi-Air_Indiaनवी दिल्ली, [२९ नोव्हेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी वातावरण बदलावरील जागतिक परिषदेत सहभागी होण्यासाठी विशेष विमानाने पॅरिसला रवाना झाले. ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव रोखण्याची जबाबदारी जगाच्या पाठीवरील प्रत्येक देशाची आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
‘मी आज पॅरिसला रवाना झालो. पर्यावरण आणि वातावरण बदलाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर या जागतिक परिषदेत चर्चा होणार आहे,’ असे ट्विट पंतप्रधानांनी पॅरिसला रवाना होण्यापूर्वी केले. या परिषदेच्या अनुषंगाने मी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद आम्ही संयुक्तपणे सौर ऊर्जेवरील आंतरराष्ट्रीय बैठकीचेही आयोजन करणार आहोत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारत वचनबद्ध आहे, असेही पंतप्रधानांनी अन्य एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
पर्यावरण बदलावरील परिषदेसोबतच, पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आयोजित केलेल्या ‘मिशन इनोव्हेशन’ परिषदेतही सहभागी होणार आहेत. याच परिषदेच्या अनुषंगाने मोदी आणि ओबामा यांच्यात दहशतवादासह विविध मुद्यांवर सविस्तर चर्चाही होणार आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25854

Posted by on Nov 30 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1115 of 2450 articles)


भोपाळ, [२९ नोव्हेंबर] - मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज रविवारी मुख्यमंत्रिपदाची दहा वर्षांची कारकीर्द पूर्ण केली. सलग दहा वर्षे ...

×