Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » पत्रकाराने ४.२८ कोटींमध्ये घेतले दाऊदचे हॉटेल

पत्रकाराने ४.२८ कोटींमध्ये घेतले दाऊदचे हॉटेल

journalist Balakrishnan purchesed dawoods propertyमुंबई, [९ डिसेंबर] – मुंबईचे पत्रकार बालकृष्णन यांनी धमक्यांना भीक न घालता अखेर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची संपत्ती खरेदी केलीच. कुख्यात गुंड छोटा शकील याने एसएमएस करून दाऊदच्या संपत्तीच्या लिलावात सहभागी होऊ नका, अशी धमकी बालकृष्णन यांना दिली होती. बालकृष्णन यांनी दाऊदची भेंडीबाजार स्थित संपत्ती लिलावातून खरेदी केली आहे.
दाऊद इब्राहिमच्या संपत्तीच्या लिलावात सर्वसामान्य नागरिकांनी फारसे स्वारस्य दाखविले नाही. फारच कमी लोकांनी बोलीत सहभाग नोंदविला. यात पत्रकार बालकृष्णन यांचाही समावेश होता. बालकृष्णन यांना भेंडी बाजारातील दाऊदचे हॉटेल ‘दिल्ली जायका’ खरेदी करण्याची इच्छा होती. हे रेस्टॉरेंट रौनक अफरोज नावाने ओळखले जाते.
दिल्ली जायका या हॉटेलची किंमत १.१८ कोटी रुपये ठरविण्यात आली होती. मात्र, बोली लावणे सुरू होताच याची किंमत वाढून ती ४.२८ कोटी रुपयांवर पोहोचली. शेवटची बोली पत्रकार बालकृष्णन यांची होती. अशाप्रकारे एक पत्रकार आता दाऊदच्या हॉटेलचा मालक झाला आहे. हे हॉटेल दंबारवाला इमारतीत आहे, जे दाऊदच्या घराच्या अगदी जवळ आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26070

Posted by on Dec 10 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1053 of 2452 articles)


कच्छ, [९ डिसेंबर] - गुजरातमधील कच्छमध्ये दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘रणोत्सव’ १५ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ‘रणोत्सव’ हा जगातील सर्वात ...

×