Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » पाकमधील पंजाब प्रांत इसिसच्या हिटलिस्टवर

पाकमधील पंजाब प्रांत इसिसच्या हिटलिस्टवर

Pakistan_Map1रावळपिंडी, [२८ नोव्हेंबर] – इसिसच्या हिटलिस्टवर आता पाकिस्तानातील पंजाब प्रांत असून, तिथे घातपात घडवून आणण्याकरिता इसिसच्या छुप्या कारवाया सुरू असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.
येथील नागरी व महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांना इसिसने टारगेट केले असून, येथे आगामी काळात कधीही मोठा हल्ला होईल, अशी शक्यता सुरक्षा यंत्रणेने वर्तविली आहे.
पाकमध्ये इसिसचे अस्तित्त्व नाहीच, पंजाबमध्ये तर अजिबातच नाही, असे पंजाब प्रांताचे कायदामंत्री राणा सनाउल्ला यांनी ठामपणे म्हटले होते. पाकिस्तानी सरकार तर अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. मात्र गुप्तचर यंत्रणांनी या आगामी हल्ल्याची तपशीलवार माहिती दिली आहे. त्यानुसार, पाच सशस्त्र दहशतवादी सध्या लाहोरमध्ये असून, काही खाजगी कंपन्यांवर हल्ले करण्याची त्यांची योजना आहे. या कंपन्यांच्या सुरक्षा रक्षकांवर बेछूट गोळीबार करीत कंपन्यांवर ताब्यात घेण्याची इसिसची योजना आहे, असे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले असून, या अनुषंगाने येथील दहशतवादविरोधी पथकाला तातडीने हालचाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25803

Posted by on Nov 29 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1134 of 2458 articles)


=इमाम बुखारी यांचा दावा= कानपूर, [२८ नोव्हेंबर] - मुस्लिम मतांवर डोळा ठेवून नेहमीच हिंदूवर टीका करणारे समाजवादी पार्टीचे नेते आणि ...

×