Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » पाकिस्तान दहशतवाद्यांचे नंदनवनच

पाकिस्तान दहशतवाद्यांचे नंदनवनच

=करझई यांची स्पष्ट भूमिका=
Afghan-president-Hamid-Karzaiकाबुल, [२० ऑगस्ट] – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानवर व्यक्त केलेल्या मताला पाठिंबा देत अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझई यांनी, पाकिस्तान हे दहशतवाद्यांसाठी नंदनवनच असल्याचा स्पष्ट आरोप केला.
पाकिस्तानचे सैनिक बलुचिस्तानमध्ये नागरिकांवर अतोनात अत्याचार करीत असून, त्याचे गंभीर परिणाम शेजारी देशांना भोगावे लागत आहेत, असे सांगताना करझई म्हणाले की, जगभरातील दहशतवाद्यांना पाकने आपल्या भूमीत आश्रय दिला आहे. हे दहशतवादी अन्य देशांमध्ये हल्ले करतात आणि पाकमध्ये जाऊन लपतात. पाकमधील राज्यकर्ते त्यांचे पूर्ण समर्थन करतात.
पाकच्या दहशतवादी धोरणामुळेच दक्षिण आशियातील शांततेला धोका निर्माण झाला आहे. दहशतवादी हे कोणाचेच नसतात आणि त्यांना कोणतीही सीमा नसते. असे असतानाही पाक दुसर्‍या देशांविरुद्ध दहशतवादाचे धोरण वारंवार स्वीकारत आहे, अशी टीकाही करझई यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणातून बलुचिस्तानमध्ये पाकी सैनिकांकडून सुरू असलेल्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या बोलण्यात सत्यता आहे. कारण, बलुचमधील अत्याचाराच्या बातम्या आमच्याही कानावर येत आहेत. भारत अफगाण आणि बलुचचा वापर आपल्याविरुद्ध करीत असल्याचा पाकचा आरोप आहे. पण, त्यात सत्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29240

Posted by on Aug 21 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (110 of 2458 articles)


=राजनाथसिंह यांचा स्पष्ट आरोप= शाहजहानपूर, [२० ऑगस्ट] - अतिरेकी कमांडर बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोर्‍यात जो हिंसाचार सुरू आहे, त्यामागे ...

×