Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पाच राज्यांमध्ये केवळ नऊ अपक्ष विजयी

पाच राज्यांमध्ये केवळ नऊ अपक्ष विजयी

Election-may-held-in-5-Statesनवी दिल्ली, [२२ मे] – निवडणुका म्हटल्या की अपक्षांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत असते आणि अनेकदा त्यांच्याच हातात सत्तेची किल्ली देखील जाते. पण, नुकत्याच पाच राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्षांना तोंडघशी पडावे लागले आहे. पाचही राज्यांमध्ये एकूण ३५२६ उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यातील केवळ नऊच विजयी झाले आहेत.
पश्‍चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ ही चार राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेश पुद्दुचेरीत विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या होत्या. जे नऊ अपक्ष उमेदवार निवडून गेले आहेत, त्यातील सहा जण एकट्या केरळचे आहेत. तर, पश्‍चिम बंगाल, आसाम व पुद्दुचेरीतून प्रत्येकी एक अपक्ष यशस्वी झाला आहे. तामिळनाडूतून १५६६ अपक्ष उमेदवार रिंगणात होते. पण, यातील एकालाही विजय मिळविता आला नाही.
या ३५२६ अपक्षांपैकी केरळातून ७८२, आसामातून ७११, पश्‍चिम बंगालमधून ३७१ आणि पुद्दुचेरीतून ९६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, असे निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीतून दिसून आले आहे. या पाचही राज्यांमध्ये १४ एप्रिल ते १६ मे या कालावधीत विविध टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यात आल्या होत्या. या पाचही राज्यांमध्ये एकूण ८८७३ उमेदवार उभे होते. त्यातही सर्वाधिक ३७७६ उमेदवार तामिळनाडूत होते. त्याखालोखाल पश्‍चिम बंगालमध्ये १९६१, आसामात १५८१, केरळात १२०३ आणि पुद्दुचेरीत ३४४ उमेदवार आपले भाग्य आजमावत होते. त्याचप्रमाणे पाच राज्यांमध्ये एकूण ७६१ महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यातील ३२० महिला तामिळनाडूतून, २०० महिला पश्‍चिम बंगालमधून, १११ महिला आसामातून, १०९ केरळातून आणि २१ महिला पुद्दुचेरीतून उभ्या होत्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28415

Posted by on May 22 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (295 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२२ मे] - केरळात सत्तेवर येताच माकपप्रणीत डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचाराचा कळस गाठला असल्याने याकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपाच्या ...

×