Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा

पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा

PM MODI MAN KI BAATनवी दिल्ली, [२२ मे] – नुकत्याच जाहीर झालेल्या काही शालेय परीक्षांच्या निकालांमध्ये यश प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. त्याचवेळी त्यांनी पालकांना आपल्या अपेक्षा मुलांवर लादू नका, असे कळकळीचे आवाहनही केले. दुष्काळाचा उल्लेख करताना, पावसाळा आता जवळ आला असल्याने या पावसाळ्यात पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करा, असा मोलाचा सल्लाही पंतप्रधानांनी दिला.
आकाशवाणीवरील अतिशय लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी यांनी आज रविवारी देशवासीयांशी संवाद साधला. ते म्हणाले की, नुकत्याच जाहीर झालेल्या सीबीएसई परीक्षेत मध्यप्रदेशच्या गौरवने ८९ टक्के गुण मिळविले. मला खूप आनंद झाला. पण, गौरवच्या मते, त्याचे पालक खुश नाही, त्यांना ९० टक्के गुण अपेक्षित होते. त्यामुळे मी सर्व पालकांना विनंती करतो की, समाधानाच्या भावनेतून मुलांचा निकाल स्वीकारा आणि त्यांना भविष्य घडविण्यासाठी प्रेरित करा. त्यांच्यावर स्वत:च्या अपेक्षा लादू नका.
जल आणि वन संवर्धनावर बोलताना त्यांनी अलीकडेच काही राज्यांमधील वणव्याचा उल्लेख केला. वन आणि जल संवर्धन करणे हेच आपले कर्तव्य आहे. पावसाळा आता जवळ आला असल्याने पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. पाण्याच्या भीषण दुष्काळाचा सामना करीत असलेल्या काही राज्यांनी या दिशेने ठोस पुढाकार घेतला आहे. जल संवर्धनासाठी काही विशिष्ट योजना राबविता येऊ शकते काय, अशी विचारणा मी नीती आयोगाला केली आहे. दुष्काळाच्या मुद्यावर मी प्रत्येक राज्याच्या संपर्कात आहो आणि उपाय योजनांवर चर्चाही करीत आहे, असे पंतप्रधानांनी आपल्या ३० मिनिटांच्या संबोधनात सांगितले.
यावेळी त्यांनी सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या अनेक योजनांचीही माहिती दिली. शेती करण्याची पद्धत बदलण्याची आवश्यकता आहे. पाणी वाचविण्यासाठी काही राज्यांत बंधारे बांधून पाणी रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगताना ते म्हणाले की, जनधन योजना आणि आधार यामुळे कॅशलेस सोसायटीची निर्मिती होत आहे. याचा फायदा काळा पैसा रोखण्यात झाला आहे. येत्या २१ जून रोजी संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहे. त्या दिवशी सर्वांनी योगा करावा, अशी माझी अपेक्षा आहे. मी स्वत: देखील २१ जून रोजी चंदीगडमध्ये योगा करणार आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28430

Posted by on May 23 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (286 of 2450 articles)


=अमेरिकेचा यशस्वी ड्रोन हल्ला= वॉशिंग्टन/काबुल, [२२ मे] - पाकिस्तान-अफगाण सीमेवरील पाकच्या भूमीत लपून बसलेला अफगाण तालिबान या जहाल दहशतवादी संघटनेचा ...

×