richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » पावसाळी अधिवेशनात अनेक विधेयके पारित होतील

पावसाळी अधिवेशनात अनेक विधेयके पारित होतील

=मुख्तार अब्बास यांना आशा=
mukhtar-abbas-naqviनवी दिल्ली, [२५ जून] – संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता असून, या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके पारित होतील, अशी आशा संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी शनिवारी व्यक्त केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक विधेयके पारित होऊ शकली नव्हती. विशेष म्हणजे जीएसटीसह अन्य विधेयके सरकारने या अधिवेशनात आणलीच नव्हती. कारण त्यावेळी राज्यसभेत सत्ताधारी पक्ष अल्पमतात होता.
आतापर्यंत राज्यसभेत आम्ही अल्पमतात होतो, त्यामुळे विधेयके पारित करण्यात आम्हाला अडचण येत होती. आता मात्र राज्यसभेत आमचे संख्याबळ वाढले असल्याने यावेळी अनेक महत्त्वाची विधेयके पारित करून घेण्यात अडचण येणार नाही, असा विश्‍वास नकवी यांनी व्यक्त केला.
राज्यसभेत भाजपाचे ५४ सदस्य असून, मित्रपक्षांचे मिळून आमचे संख्याबळ ६२ वर जाते. याशिवाय दहा अपक्ष खासदारांचाही भाजपाला पाठिंबा आहे, याकडे नकवी यांनी लक्ष वेधले. जीएसटीच्या मुद्यावर कॉंग्रेसच्या अनेक सदस्यांचाही आम्हाला पाठिंबा आहे, असेही ते म्हणाले.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख अद्याप ठरलेली नाही. २९ जूनला होणार्‍या संसदीय कामकाज विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत अधिवेशनाची तारीख निश्‍चित केली जाईल, असे नकवी यांनी स्पष्ट केले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28796

Posted by on 4:13 am. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google