richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पीओके परत घेण्याची भारताची हिंमत नाही: अब्दुल्ला

पीओके परत घेण्याची भारताची हिंमत नाही: अब्दुल्ला

Farooq-Abdullahश्रीनगर, [३ डिसेंबर] – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग असल्याच्या आपल्या विधानाचे समर्थन केले असून सीमापार करून पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याची हिंमत भारताकडे नसल्याचे आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे.
पीओके पाकचाच भाग आहे आणि तो त्यांचाच राहणार. सीमापार करून काश्मीर परत घेण्याची हिंमत ना दिल्लीत आहे ना इस्लामाबाद जम्मू-काश्मीरवर कब्जा करण्यास सक्षम आहे, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. मी दीर्घ काळापासून राजकारणात आहे आणि आमच्याकडे पीओके परत घेण्याची शक्ती नाही आणि पाकिस्तानला जम्मू-काश्मीर बळकावण्याची हिंमत नाही, हे माझ्या लक्षात आले आहे, असेही ते म्हणाले.
पाकव्याप्त काश्मीरला असलेली स्वायत्तता पाकला द्यावी आणि जम्मू-काश्मीरवर आमचा अधिकार कायम राहील, असा तोडगा काढला तर सीमवाद सोडविला जाऊ शकतो. यामुळे दोन्ही देशातील लोकांना सीमापार करणे सहज शक्य होईल आणि तणाव संपुष्टात येऊ शकतो, असेही अब्दुल्ला म्हणाले. हा तोडगा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीच सुचवला होता, असे सांगून भाजपाकडून या मुद्यावरून केल्या जाणार्‍या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25972

Posted by on 5:10 am. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google