Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पुरस्कार वापसी हा अपमान!

पुरस्कार वापसी हा अपमान!

=लेखक, साहित्यिक, बुद्धिवंतांना राष्ट्रपतींच्या कानपिचक्या=
pranab-mukherjee_290नवी दिल्ली, [१६ नोव्हेंबर] – भावनेच्या भरात वाहून न जाता चर्चेच्या माध्यमातून कोणत्याही समस्येवर तोडगा शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज केले. यावेळी राष्ट्रपती मुखर्जी यांनी असहिष्णुतेच्या मुद्यावर केंद्र सरकारविरुद्ध रान उठवत पुरस्कार परत करणार्‍या देशातील लेखकांची, साहित्यिकांची आणि विचारवंतांची चांगलीच कानउघाडणी केली.
देशात घडणार्‍या काही घटनांनी संवेदनशील लोकांनी विचलित न होता आणि भावनेच्या भरात वाहून न जाता संतुलित भूमिका घेतली पाहिजे, असे स्पष्ट करीत राष्ट्रपती म्हणाले की, जेव्हाजेव्हा गरज पडली तेव्हातेव्हा आपल्या देशाने स्वत:मध्ये सुधारणा करण्याची हिंमत दाखवली आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या देशाच्या भारत नावाच्या विचारावर, त्याच्या मूल्यांवर आणि संविधानातील स्थापित आदर्शांवर विश्‍वास ठेवला पाहिजे. प्रेस डे निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पुरस्कार परत करण्याच्या देशातील काही लेखकांच्या, साहित्यिकांच्या आणि विचारवंतांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत राष्ट्रपती म्हणाले की, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या, आघाडीवर असणार्‍या लोकांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या कलागुणांचा पुरस्कार देऊन समाज सन्मान करीत असतो. त्यामुळे याची जाणिव पुरस्कार मिळालेल्या लोकांनी ठेवण्याची गरज आहे.
याआधी देशात असहिष्णुतेचे वातावरण वाढेल, अशा घटना घडणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सरकारला अप्रत्यक्षरित्या केले होते. आज राष्ट्रपतींनी पहिल्यांदाच पुरस्कार वापस करणार्‍या साहित्यिकांना पुरस्कार वापस न करण्याचे खुले आवाहन केले आहे. त्यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
याआधी पुरस्कार परत करणार्‍या लेखकांच्या, साहित्यिकांच्या आणि बुद्धिवंतांच्या विरोधात प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी राष्ट्रपती भवनावर मार्च काढत राष्ट्रपतींंना निवेदन दिले होते. राष्ट्रपतींच्या या आवाहनाला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25498

Posted by on Nov 17 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1228 of 2453 articles)


मुंबई, [१६ नोव्हेंबर] - बॉलिवूडमध्ये अनेक अजरामर भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचे आज वयाच्या ८६ व्या वर्षी निधन ...

×