richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » पूर्ण राज्याच्या दर्जासाठी दिल्लीतही जनमत संग्रह घ्या : केजरीवाल

पूर्ण राज्याच्या दर्जासाठी दिल्लीतही जनमत संग्रह घ्या : केजरीवाल

Kejriwalनवी दिल्ली, [२४ जून] – युरोपीयन समुदायातून बाहेर पडण्याच्या जनमत संग्रहाच्या ब्रिटनच्या निर्णयानंतर दिल्लीतही जनमत संग्रह घेण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी जनमत संग्रह घेण्याची मागणी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केली आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची केजरीवाल यांच्या पक्षाची मागणी आहे. सत्तेवर आल्यानंतर दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची घोषणा केजरीवाल यांनी आपल्या पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यातून केली आहे.
दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी कशा पद्धतीने जनमत संग्रह घेता येईल, अशी विचारणा केजरीवाल यांनी शहरी विकास मंत्रालयाला पत्र पाठवून केली आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणारे विधेयकही केजरीवाल यांनी तयार केले असून ते लोकांच्या प्रतिक्रियेसाठी सादर करण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली असता, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली होती.
आपचे प्रवक्ता आशीष खेतान यांनीही, लोकशाहीत लोकांची इच्छा हीच सर्वोच्च असते, असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनी संपूर्ण देशात जनमत संग्रह करण्याची केजरीवाल यांची इच्छा आहे का अशी विचारणा केली आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28762

Posted by on 3:20 pm. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google