Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » पॅरिसमध्ये पुन्हा स्फोट

पॅरिसमध्ये पुन्हा स्फोट

  • पोलिसांच्या गोळीबारात दोन दहतशवाद्यांचा खात्मा
  • पाच जणांना अटक, मुख्य सूत्रधाराची नाकेबंदी
  • आत्मघाती महिलेने स्वत:ला उडवले

French soldiers patrol near the Eiffel Tower in Paris as part of the "Vigipirate" security planपॅरिस, [१८ नोव्हेंबर] – गेल्या शनिवारी पॅरिसवर झालेल्या भीषण दहतशवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधाराला जेरबंद करण्यासाठी फ्रान्स पोलिसांकडून सुरू असलेल्या व्यापक धाडसत्राच्या काळात आज बुधवारी सॅन डेनिस या उपनगरात अतिरेक्यांसोबत जोरदार चकमक झडली. यात दोन अतिरेक्यांचा पोलिसांनी खात्मा केला असून, पाच जणांना अटक केली आहे. तर, मुख्य सूत्रधार अब्देलहमीद अबाऊद एका इमारतीत लपून बसला असल्याचे वृत्त आहे.
या उपनगरातील एका ठिकाणी पोलिस पोचल्यानंतर त्यांच्यावर अचानक गोळीबार झाला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला. याचवेळी मानवी बॉम्ब बनलेल्या एका तरुणीने स्वत:ला उडविले. पोलिसांच्या गोळीबारात दोन अतिरेकी ठार झाले, तर पाच जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. या चकमकीत चार पोलिसही किरकोळ जखमी झाले आहेत. या सर्व अतिरेक्यांनी एका इमारतीत आश्रय घेतला होता. इमारतीतीलच एका ठिकाणी अब्देलहमीदही लपला असल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी या परिसराची चौफेर नाकेबंदी केली आहे. पोलिसांच्या मदतीला लष्कराची एक तुकडीही तैनात करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस प्रवक्त्याने दिली.
दरम्यान, ही चकमक सुरू असतानाच, अतिरेक्यांनी या परिसरात एकामागोमाग सात बॉम्बस्फोट घडवून आणले. तथापि, पोलिसांनी हा परिसर आधीच रिकामा केला होता. त्यामुळे यात कोणतीही हानी झाली नाही, असे प्रवक्ता म्हणाला.
शनिवारच्या शक्तिशाली हल्ल्यानंतर देशात लपून बसलेल्या इसिसच्या अतिरेक्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेच्या काळात सॅन डेनिस या उपनगरातील एका अपार्टमेंटमध्ये काही संशयित अतिरेकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
हवाई हल्ले सुरूच
दरम्यान, पॅरिस हल्ल्यानंतर सुडाने पेटलेल्या फ्रान्सच्या हवाई दलाने आजही इसिसच्या राक्का येथील अड्ड्यांवर जोरदार हवाई हल्ले सुरू ठेवले. लढाऊ विमानांनी इसिसचे मुख्यालय असलेल्या या शहराच्या विविध भागांमध्ये बॉम्ब टाकले असून, यात इसिसचे शस्त्रागार आणि कमांड सेंटर्सचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25554

Posted by on Nov 18 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (1220 of 2460 articles)


=केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय= नवी दिल्ली, [१८ नोव्हेंबर] - आर्थिक संकटात सापडलेल्या साखर कारखान्यांना मदतीचा हात देण्यासाठी २०१५-१६ या वर्षाकरिता उसउत्पादक ...

×