Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » प्रधानमंत्री आवास योजनेसाठी २५०८ शहरांची निवड

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी २५०८ शहरांची निवड

=लोकसभेत सरकारची माहिती=
Prime-minister-Awaas-Yojanaनवी दिल्ली, [४ मे] – ग्रामीण गरिबांना परवडणार्‍या किमतीत हक्काचे घर मिळावे, यासाठी राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत देशाच्या २६ राज्यांतील २५०८ शहरांची निवड करण्यात आली, अशी माहिती सरकारतर्फे आज बुधवारी लोकसभेत देण्यात आली.
२५ एप्रिल २०१६ पर्यंत सर्वांना हक्काचे घर योजनेंतर्गत एकूण २५०८ शहरांची निवड करण्यात आली आहे, असे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी प्रश्‍नोत्तराच्या काळात एका प्रश्‍नात सांगितले.
या योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, भूकंप, पूर, चक्रिवादळ आणि भूस्खलन यासारख्या नैसर्गिक संकटातही टिकाव धरू शकेल, अशाच घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी आम्ही राष्ट्रीय इमारत संहिता आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्डच्या प्रमाणांचे काटेकोर पालन करणार आहोत, असे नायडू म्हणाले.
राज्यांना तेथील भौगोलिक व नैसर्गिक वातावरणानुसार त्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर करून या घरांचे प्रारूप तयार करण्याची परवानगीही याअंतर्गत देण्यात आली आहे, असे सांगताना ते म्हणाले की, आगामी सात वर्षांत देशभरात दोन कोटी घरांची बांधणी करण्याचा आमचा उद्देश आहे. २०१५ मध्ये यासाठी सुरू झालेले अभियान २०२२ मध्ये पूर्ण होणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28171

Posted by on May 5 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (378 of 2453 articles)


=धर्मेंद्र प्रधान यांची माहिती= नवी दिल्ली, [४ मे] - स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडवरील सब्‌सिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सरकारच्या ...

×