richwood
richwood
richwood
Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » फ्रांसमध्ये १६० मशिदी होणार बंद

फ्रांसमध्ये १६० मशिदी होणार बंद

france mosqueपॅरिस, [४ डिसेंबर] – पॅरिसमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर हादरलेल्या फ्रान्स सरकारने देशभरातील १६० विनापरवाना मशिदी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार, काही महिन्यांसाठी मशिदी बंद ठेवण्यात येणार आहेत.
या मशिदींमधून धार्मिक विचारांच्या नावाखाली दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते, असा पोलिसांना संशय आहे. देशाचे गृहमंत्री बर्नार्ड कॅजनेब यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या आपात्कालीन स्थितीत देण्यात आलेल्या विशेषाधिकारांच्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. मशिदी बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून, गेल्या दोन आठवड्यांत तीन मशिदी बंद करण्यात आल्या आहेत. या सर्व मशिदींमधून जिहादी प्रचार साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, या हल्ल्यांप्रकरणी आतापर्यंत २३२ लोकांना अटक करण्यात आली आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26011

Posted by on 3:42 pm. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google