Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » बँक ऑफ बडोदात ६ हजार कोटींचा घोटाळा

बँक ऑफ बडोदात ६ हजार कोटींचा घोटाळा

=रिक्षावाले, मजूरही झाले संचालक, काळा पैसा पांढरा करण्याचा नवा फंडा=
bankofbarodaनवी दिल्ली, [२३ नोव्हेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाच्या उगमस्थानावरच घाव घातल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहे. आपल्याजवळील काळा पैसा पांढरा करण्यासाठी बड्या उद्योगपतींमध्ये आगळीच स्पर्धा सुरू झाली असून, यासाठी त्यांनी अफलातून फंडा अवलंबला आहे. याचाच एक भाग म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये सहा हजारांपेक्षा जास्त कोटींचा हवाला घोटाळा उघडकीस आला आहे.
आपला काळा पैसा पांढरा करण्यासाठी काही उद्योजकांनी या बँकेतील अधिकार्‍यांशी संगनमत करून चक्क फेरीवाले, रिक्षावाले आणि मजुरांच्या नावे बनावट खाती उघडली आणि या माध्यमातून आतापर्यंत हॉंगकॉंग, दुबई यासारख्या देशांमध्ये सहा हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम पाठविण्यात आली, असे सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीत उघड झाले आहे.
सीबीआय आणि ईडीतर्फे या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत विदेशी बँकां आणि देशात लपवून ठेवण्यात आलेला काळा पैसा शोधून काढण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) गठित केले होते. यामुळे काळा पैसा जमा करणार्‍यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तेव्हापासूनच स्वत:चा बचाव करण्यासाठी या लोकांची धावपळ सुरू झाली होती.
गुरुचरण सिंह, चंदन भाटिया, संजय अग्रवाल यासह काही उद्योजकांनी बँक ऑफ बडोदाच्या दिल्लीतील अशोक विहार शाखेचे सहाय्यक व्यवस्थापक एस. के. गर्ग व जैनिश दुबे यांच्याशी हातमिळवणी केली. त्यानंतर गर्ग आणि दुबे यांनी उद्योजकांच्या वतीने दिल्लीतील झोपडपट्टीत राहणार्‍या गरिबांना गाठून त्यांच्याकडून मतदान ओळखपत्रे प्राप्त केली. त्या मोबदल्यात त्यांना महिन्याला १० ते १५ हजार रुपये देण्याचे आमिष दाखविण्यात आले. पैशाच्या लोभाने फेरीवाले व रिक्षाचालकांनी कोणताही विचार न करता आपली ओळखपत्रे गर्ग आणि दुबेच्या हवाली केली. मतदान ओळखपत्राच्या आधारे या दोघांनी पॅन कार्ड तयार केले आणि बँक ऑफ बडोदामध्ये बनावट कंपन्यांच्या नावे तब्बल ५९ खाती उघडली. दिल्लीतील फेरीवाले, रिक्षावाले, झोपडपट्टीत राहणारे व घरकाम करणारे लोक या कंपन्यांचे संचालक व भागीदार म्हणून दाखविण्यात आले. त्यानंतर बनावट कंपन्यांच्या नावे पैशाचे व्यवहार सुरू झाले. या कंपन्यांनी सुका मेवा, कडधान्य आणि तांदूळ आयात केल्याचे कागदावर दाखविले, मात्र प्रत्यक्षात कशाचीही आयात केली गेली नाही. ऑगस्ट २०१४ ते ऑगस्ट २०१५ या एका वर्षात बँक ऑफ बडोदातील ५९ खात्यांमध्ये ६ हजार १७२ कोटी जमा करण्यात आल्याचे चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी गर्ग व दुबे यांना अटक करण्यात आली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25690

Posted by on Nov 24 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1170 of 2456 articles)


=संरक्षण मंत्री पर्रीकर यांचा इशारा, लष्कराला दिला सावधानतेचा सल्ला= नवी दिल्ली, [२३ नोव्हेंबर] - भविष्यातील युद्ध कदाचित सायबर क्षेत्रात लढले ...

×