Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » बर झालं, मी केजरीवालांची साथ सोडली

बर झालं, मी केजरीवालांची साथ सोडली

=लालू भेटीवर अण्णांचा हल्ला=
Anna Hazareराळेगणसिद्धी, [२४ नोव्हेंबर] – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या शपथविधी सोहळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व राजदचे अध्यक्ष आणि चारा घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार लालूप्रसाद यादव यांच्यात झालेल्या गळाभेटीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही आज मंगळवारी टीका केली. त्यांची गळाभेट लाज वाटावी अशीच होती. बरं झालं, मी फार आधीच केजरीवाल यांची साथ सोडली होती, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली.
केजरीवाल आणि कंपनी माझ्या आंदोलनातून बाहेर पडले, हे फारच चांगले झाले. अन्यथा आज मलाही प्रचंड नामुष्कीचा सामना करावा लागला असता. लोकांनी मला देखील भ्रष्ट संबोधले असते, असे अण्णांनी राळेगण सिद्धी या आपल्या गावी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मी व्यासपीठावर चढलो असता, लालूंनीच माझा हात धरून आपल्याकडे ओढले आणि अलिंगन दिले, अशी सारवासारव केजरीवाल यांनी सोमवारी केली होती.
लालू यादव हे भ्रष्ट नेते आहे, याची माहिती असतानाही केजरीवाल यांनी त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि त्यांची गळाभेटही घेतली. देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याची भाषा बोलणारे केजरीवाल यांनी केलेला हा प्रकार खरोखरच लाजिरवाणा आहे आणि लालू-केजरीवाल भेटीचे मी कदापि समर्थन करणार नाही, असेही अण्णांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25693

Posted by on Nov 24 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1164 of 2451 articles)


=रिक्षावाले, मजूरही झाले संचालक, काळा पैसा पांढरा करण्याचा नवा फंडा= नवी दिल्ली, [२३ नोव्हेंबर] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या ...

×