Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » बाबासाहेबांनी देश सोडण्याची भाषा केली नाही

बाबासाहेबांनी देश सोडण्याची भाषा केली नाही

=राजनाथसिंह यांचे प्रतिपादन, आमिर खानच्या वक्तव्याचा खरपूस समाचार=
RAJNATH_SINGH_19नवी दिल्ली, [२६ नोव्हेंबर] – भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रऋषी आहेत. तेदेखील पक्षपाताचे शिकार ठरले, अनेकदा अपमानित व्हावे लागले, पण त्यांनी कधीही भारत सोडून जाण्याची भाषा तर सोडा, विचारही केला नाही, असे स्पष्ट प्रतिपादन करून, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी असहिष्णुतेच्या नावाखाली देश सोडून जाण्याची भाषा करणार्‍या अभिनेता आमिर खानला जोरदार चिमटा घेतला.
भारतात अनेकदा अपमानित होऊन, पक्षपाताचे शिकार ठरूनही डॉ. आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटनेच्या निर्मितीत अमूल्य असे योगदान दिले. आपली राज्यघटना बाबासाहेबांचीच देण आहे. या देशात इतका अपमान सहन करावा लागला असतानाही, त्यांनी कधीच भारत सोडण्याची आणि अन्य दुसर्‍या देशात जाण्याची भाषा वापरली नव्हती.
कॉंगे्रसवर जोरदार हल्ला
राजनाथसिंह यांनी याचवेळी राजकीय पोळी भाजण्यासाठी धर्मनिरपेक्ष शब्दाचा सर्वाधिक दुरुपयोग करणार्‍या कॉंगे्रस व राजकीय पक्षांवरही घणाघाती हल्ला चढविला. सेक्युलर या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष असा अजिबात होत नसल्यामुळे सेक्युलर या शब्दाचा वापर थांबविण्यात यावा आणि त्याऐवजी हिंदीत पंथनिरपेक्ष हा शब्द वापरला जावा, असे आवाहनही त्यांनी केली.
संसदेच्या हिवाळी अधिवेशाला आज गुरुवारपासून प्रारंभ झाला. संविधान दिन आणि राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ जयंतीनिमित्त विशेष चर्चा घडवून आणण्यासाठी अधिवेशनाचे पहिले दोन दिवस राखून ठेवण्यात आले आहेत. आज पहिल्या दिवशी संविधान दिनानिमित्त संविधानाचे वाचन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह, कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी आपले मत व्यक्त केले. यावर्षीपासून सरकारने २६ नोव्हेंबर हा संविधानदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पहिल्या संविधान दिनानिमित्त राजनाथ सिंह बोलत होते.
सर्वांना समान दर्जा मिळावा यासाठी डॉ. आंबेडकरांनी आरक्षणाचा प्रस्ताव मांडला. एवढेच नव्हे, तर सर्वांना समान स्तरावर आणायचे असल्यास देशातील अस्पृश्यता दूर करणे आवश्यक असल्याचेही डॉ. आंबेडकर म्हणाले होते. आंबेडकर यांनी आरक्षण व्यवस्था विचारपूर्वक आणली होती. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेला आत्मा मानले जाते. समाजातील सर्व घटकांना समान हक्क मिळावेत यासाठी आंबेडकरांनी प्रयत्न केले. संविधानाने देशाला एकसंध ठेवले. तेव्हा, राजकीय स्वार्थासाठी आरक्षणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न व्हायला नको, असा सल्लाही राजनाथसिंह यांनी दिला.
देशात आज धर्मनिरपेक्षा या शब्दाचा सर्वाधिक गैरवापर केला जातो. याच शब्दामुळे देशात पर्यायाने समाजात जातीय तणाव निर्माण होत आहे. घटनेच्या शिल्पकारांनीही राज्य घटनेत धर्मनिरपेक्ष हा शब्द टाकण्याचा विचार केला नव्हता. पण, या देशावर सर्वाधिक काळ राज्य करणार्‍या कॉंगे्रसने घटनेत वारंवार बदल करून हा शब्द समाविष्ट केला आहे. यावरही आमचा आक्षेप नाही. पण, समाजात तणाव निर्माण करून समाजातील घटकांनाच एकमेकांविरोधात लढण्यासाठी या शब्दाचा गैरवापर करू नका, एवढेच आमचे तुम्हाला सांगणे आहे, असेही राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25764

Posted by on Nov 27 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1146 of 2456 articles)


नवी दिल्ली, [२६ नोव्हेंबर] - बिहारच्या नितीशकुमार मंत्रिमंडळात सहभागी झालेले लालू पुत्रद्वय तेजस्वी व तेजप्रताप यांना सहकार्य व मार्गदर्शन करण्यासाठी ...

×