Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » बाबासाहेब अजूनही हृदयात जिवंत : पंतप्रधान

बाबासाहेब अजूनही हृदयात जिवंत : पंतप्रधान

=१० व १२५ रुपयांच्या नाण्यांचे विमोचन=
narendra_modi11नवी दिल्ली, [६ डिसेंबर] – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी १० आणि १२५ रुपये मूल्यांच्या नाण्यांचे विमोचन केले. बाबासाहेबांचे आर्थिक विचार आणि त्यांची दूरदृष्टी कुणालाही पूर्णपणे समजू शकली नाही. देशाच्या एकता व अखंडतेत त्यांचे योगदान अमूल्य असेच होते. मृत्यूनंतरही ते देशवासीयांच्या हृदयात जिवंत आहेत, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी बाबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आज जिथे बाबासाहेबांची ६० वी पुण्यतिथी आहे, तिथेच देशभरात त्यांची १२५ वी जयंतीही मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. याच अनुषंगाने पंतप्रधानांनी आपल्या शासकीय निवासस्थानी आयोजित एका कार्यक्रमात १० आणि १२५ रुपये मूल्य असलेल्या नाण्यांचे विमोचन केले.
सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात बाबासाहेबांचे योगदान कधीच विसरू शकत नाही. पण, त्यांचे आर्थिक विचार आणि दृष्टिकोन आजही अनेकांना कळले नाही. ते फार गाढे विचारवंत होते. मृत्यूच्या ६० वर्षांनंतरही जनमनात जिवंत राहणार्‍या काही निवडक महापुरुषांपैकी बाबासाहेब हे एक आहेत. आजच्या काळात भारतापुढील समस्यांचा विचार करताना बाबासाहेबांच्या विचारांचे जितके स्मरण करावे, तितकी त्यांची दूरदृष्टी दिसून येते आणि डॉ. आंबेडकरांबाबत तितकाच अधिकाधिक सन्मान वाटतो. बाबासाहेबांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
सामाजिक न्यायाच्या बाबतीत बाबासाहेबांचे योगदान उल्लेखनीय तर आहेच, शिवाय आर्थिक समतेबाबत त्यांचे विचार अद्‌भूत असेच आहेत. डॉ. आंबेडकर आणि त्यांची अद्‌भूत निर्मिती असलेल्या भारतीय संविधानाबाबत देशात चर्चा होणे आवश्यक आहे. २६ नोव्हेंबर रोजी देशात संविधान दिवस साजरा करणे, हे त्याच दिशेने उचलण्यात आलेले पाऊल आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि सामाजिक न्यायमंत्री थावर चंद गहलोत हेदेखील उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26020

Posted by on Dec 7 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1073 of 2453 articles)


नवी दिल्ली, [५ डिसेंबर] - जूनपासून देशात प्रथमच इंडियन एअरफोर्समध्ये महिला फायटिंग विंगमध्ये सहभागी होतील. पुढील वर्षी जूनपासून या महिला ...

×