Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » बारावीचा आज निकाल

बारावीचा आज निकाल

=दुपारी १ वाजता ऑनलाईन, ३ जूनला मिळणार गुणपत्रिका=
EXAM-resultsमुंबई, [२४ मे] – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च माहिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या बुधवार २५ मे रोजी दुपारी १ वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचे प्रिंट आऊट घेता येणार असून ३ जून रोजी ४ वाजता विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका मिळणार आहेत. मागील वर्षीपेक्षा यंदा शिक्षण मंडळाने तब्बल चार दिवस अगोदर आधी निकाल जाहीर करण्याची किमया केली आहे.
राज्यातील ८ हजार ८१८ कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शाखांमधून १३ लाख ८८ हजार ४६७ विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा २ लाख ५८१ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या राज्यातील नऊ विभागांचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. गुण पडताळणीसाठी मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना १४ जूनपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. तसेच यंदा लगेचच पुरवणी परीक्षा ही जुलै-ऑगस्टदरम्यान होणार असल्याने यासाठी उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यापासून १५ जूनपर्यंत मंडळाकडे अर्ज करता येईल.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे
www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.rediff.com/exams
http://maharashtra12.knowyourresult.com
http://maharashtra12.jagranjosh.com

Short URL: https://vrittabharati.in/?p=28472

Posted by on May 25 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (275 of 2451 articles)


स्वदेशी स्पेस शटलचे यशस्वी प्रक्षेपण उपग्रह सोडून पृथ्वीवर परतण्याची क्षमता श्रीहरिकोटा, [२३ मे] - अंतराळ क्षेत्रात एकामागोमाग अनेक विक्रम ...

×