Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ब्रेड खाल्याने होऊ शकतो कर्करोग

ब्रेड खाल्याने होऊ शकतो कर्करोग

breadनवी दिल्ली, [२३ मे] – दैनंदिन जीवनात महत्त्वाचा घटक असलेला आणि रोज सकाळी घराघरात खाण्यात येणार्‍या ब्रेड आणि पावमध्ये कर्करोगाला आमंत्रण देणारे रसायन आढळून आले आहे. राजधानी दिल्लीत ब्रेडच्या काही नमुन्यांची चाचणी केल्यानंतर याबाबतचा अहवाल आज सोमवारी जारी करण्यात आला.
ब्रेड, पाव आणि बन यासह रोजच्या उपयोगातील ब्रेडच्या ३८ नमुन्यांची विज्ञान व पर्यावरण केंद्रात चाचपणी करण्यात आली. यातील ८४ टक्के नमुन्यांमध्ये पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट यासारखे घातक रसायन आढळून आले असून, त्यामुळे कर्करोगाचाच धोका अधिक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
यातील एक रसायन २बी कार्सिनोजेन प्रकारचे असून, ते घातक असतानाही भारतात त्यावर अद्यापही बंदी घालण्यात आली नाही. ब्रेड आणि पावासोबतच पिझ्झा ब्रेड आणि बर्गर ब्रेडचीही चाचपणी करण्यात आली असून, हे दोन्ही पदार्थ दिल्लीत अतिशय लोकप्रिय आहेत. भारतातील अन्य शहरांमध्येही ते आवडीने खाल्ले जातात.
आम्ही आमच्या प्रयोगशाळेसोबतच अन्य काही प्रयोगशाळांमध्येही या नमुन्यांची चाचणी केली असून, त्यांचा अहवालही सकारात्मक आहे. ही रसायने मानवी आरोग्याला अपायकारक असून, त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढत असल्याचे विज्ञान व पर्यावरण केंद्राचे उपसंचालक चंद्र भूषण यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28446

Posted by on May 24 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (285 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२३ मे] - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उद्या मंगळवारी चीनच्या चार दिवसांच्या दौर्‍यावर रवाना होणार आहेत. आशियातील दोन महासत्ता ...

×