Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » भाजपाचे संख्याबळ वाढणार, मात्र बहुमत नाहीच

भाजपाचे संख्याबळ वाढणार, मात्र बहुमत नाहीच

=राज्यसभा निवडणूक=

New Delhi: Opposition members protest in the Rajya Sabha in New Delhi on Tuesday. PTI Photo / TV GRAB  (PTI12_22_2015_000269A)

New Delhi: Opposition members protest in the Rajya Sabha in New Delhi on Tuesday. PTI Photo / TV GRAB (PTI12_22_2015_000269A)

नवी दिल्ली, [१३ मे] – राज्यसभेच्या ५७ जागांसाठी ११ जूनला होणार्‍या निवडणुकीनंतर भाजपाचे संख्याबळ काही प्रमाणात वाढणार असले तरी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात बहुमत मिळवणे भाजपासाठी नजीकच्या काळात तरी शक्य दिसत नाही. राज्यसभेत सध्या कॉंग्रेससह विरोधकांचे बहुमत असल्याने अनेक महत्त्वपूर्ण विधेयके पारित करणे भाजपाला अडचणीचे ठरत आहे.
राज्यसभेत निवृत्त सदस्यांच्या निरोप समारंभात बोलताना पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी जीएसटी आणि कॅम्पा विधेयक पारित होऊ न शकल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. राज्यसभेच्या ज्या ५७ जागांसाठी निवडणूक होत आहे, त्यात भाजपा आणि कॉंग्रेस यांच्या प्रत्येकी १४ जागा आहेत. भाजपाचे सध्या राज्यसभेत ४९ सदस्य आहेत, तर कॉंग्रेसचे ६१. कॉंग्रेसचे प्रवीण राष्ट्रपाल यांचे गुरुवारी हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्यानंतर कॉंग्रेसचे संख्याबळ ६० वर आले आहे. या निवडणुकीत भाजपाला चार जागा जास्तीच्या मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे भाजपाचे संख्याबळ ५३ होईल, तर कॉंग्रेस ६० जागांवर कायम राहाण्याची शक्यता आहे.
मध्यंतरी ६ जणांची राज्यसभेत नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली, यामुळे भाजपाच्या संख्याबळात नसली तरी मनोबलात काही प्रमाणात वाढ झाली आहे. कारण नामनियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो. नामनियुक्त सदस्यांध्ये डॉ. सुब्रमण्यम स्वामी, नवज्योतसिंग सिद्धू, सुरेश गोपी, मेरी कोम, डॉ. नरेंद्र जाधव आणि स्वपन दासगुप्ता यांचा समावेश आहे.
भाजपप्रणीत रालोआतील घटकपक्ष पकडून भाजपाचे संख्याबळ सध्या ६२, तर इतर मित्रपक्ष मिळून कॉंग्रेसचे संख्याबळ ८० आहे.
निवृत्त होणार्‍या सदस्यांमध्ये व्यंकय्या नायडू, चौधरी वीरेंद्रसिंह, सुरेश प्रभू, पीयूष गोयल, निर्मला सीतारामन आणि मुख्तार अब्बास नकवी या भाजपाच्या सहा केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. या सर्वांना भाजपाला पुन्हा राज्यसभेवर निवडून आणायचे आहे. मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यातून भाजपाला सर्वाधिक आशा आहे. भाजपाच्या वाढणार्‍या चार जागा या तीन राज्यातून मिळण्याची शक्यता आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28219

Posted by on May 14 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (360 of 2453 articles)


=अतुलचंद्र कुलकर्णी दहशतवाद विरोधी पथकाचे नवे एडीजी= मुंबई, [१३ मे] - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या ...

×