Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » भारतविरोधी वक्तव्ये करू नका

भारतविरोधी वक्तव्ये करू नका

=नवाझ शरीफांचे मंत्र्यांना निर्देश=
Pakistan Prime Minister Nawaz Sharifइस्लामाबाद, [१९ डिसेंबर] – नवी दिल्ली आणि इस्लामाबाद यांच्यात नव्याने सुरू झालेल्या शांतता चर्चेत विघ्न येऊ नये, यासाठी भारतविरोधी वक्तव्ये करणे थांबवा, असे निर्देश पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मंत्रिमंडळातील सहकार्‍यांना दिले आहेत.
शांतता प्रक्रियेला बाधा पोचेल असे कोणतेही व्यक्त करू नका, असे निर्देश मंत्री आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत, असे शरीफांच्या एका निकटर्तियाने याबाबत माहिती देताना सांगितले. ‘भूतकाळातील गोष्टी उकरून काढण्यापेक्षा शांतता प्रक्रियेला बळ मिळेल असेच वक्तव्य करावे. शांततेला प्रोत्साहन द्या, असे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मंत्रिमंडळातील सहकारी आणि अधिकार्‍यांना सांगितले आहे’, असे एका अधिकार्‍याने सांगितल्याचे द नेशन या वृत्तपत्राच्या वृत्तात म्हटले आहे.
भारतासोबत संबंध सुधारतील आणि उपखंडाला याचा फायदा होईल, याबाबत नवाझ शरीफ आशावादी आहेत. भारत फक्त पाकव्याप्त काश्मीरबाबतच चर्चेस इच्छुक असल्याच्या कथित वक्तव्याबाबत शरीफ यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु, हे भारत सरकारचे धोरण नसावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्याचे हा अधिकारी म्हणाला. दोन्ही देश शांततेवर चर्चा करतील तेव्हा काश्मीर, दहशतवाद आणि व्यापार या तीन विषयांना प्राधान्य देण्यास शरीफ उत्सुक आहेत, असेही या अधिकार्‍याने स्पष्ट केले.
भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्याच्या मुद्यावर नागरी प्रशासन आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे आणखी एका अधिकार्‍याने सांगितले. सरकार व लष्करात कोणतेही मतभेद नसून, महत्त्वाच्या मुद्यांवर आधीपासून घेण्यात आलेल्या भूमिकेत कोणताही बदल होऊ नये, यावर एकमत असल्याचे या अधिकार्‍याने स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26224

Posted by on Dec 20 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1008 of 2458 articles)


मुंबई, [१९ डिसेंबर] - मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी पाच वर्षाची शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त पुढील वर्षी फेबु्रवारी महिन्यात म्हणजे दीड ...

×