richwood
richwood
richwood
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » भारताचे एनएसजी सदस्यत्व हुकले, चीनचा खोडा

भारताचे एनएसजी सदस्यत्व हुकले, चीनचा खोडा

NSG-Nuclear-Suppliers-Groupसेऊल, [२४ जून] – अथक प्रयत्न केल्यानंतरही चीनच्या प्रखर विरोधामुळे भारताला ४८ सदस्यांच्या अणुपुरवठादार देशांच्या गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यात अखेर अपयश आले. या मार्गात सातत्याने अडथळे आणल्याबद्दल भारताने चीनवर टीका केली आहे.
सेऊल येथे झालेल्या एनएसजी सदस्यांच्या दोन दिवसीय बैठकीत अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केली नसल्याचे कारण देत या गटाने भारताने सादर केलेल्या अर्जावर विचार करण्यास नकार दिला. ४८ पैकी तब्बल ३८ देशांनी भारताला पाठिंबा दिल्यानंतरही पाकिस्तानच्या सदस्यत्वासाठी आग्रह धरणार्‍या चीनने भारताला प्रखर विरोध केला. एनएसजीचा कारभार सार्वमताच्या आधारे चालत असल्याने काही देशांच्या विरोधामुळे भारताचे एनएसजी सदस्यत्व थोडक्यात हुकले.
ताश्कंद दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीच्या वेळी, भारताने सदस्यत्वासाठी केलेल्या अर्जाचे त्या देशाने निष्पक्ष व वस्तुनिष्ठपणे विश्‍लेषण करून पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली होती. परंतु, चीनने आपला प्रखर विरोध अखेरपर्यंत कायम ठेवला.
एकाच देशाचा अडथळा : भारत
४८ सदस्यांच्या एनएसजीचे सदस्यत्व मिळण्याबाबत एकाच देशाने सातत्याने प्रक्रियात्मक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे सदस्यत्व न मिळाल्यामुळे निराश झालेल्या भारताने म्हटले आहे. भारताची ही प्रतिक्रिया म्हणजे सातत्याने विरोध करणार्‍या चीनकडे केलेला निर्देश आहे.
भारत एनएसजीमध्ये सहभागी झाल्यास अण्वस्त्र प्रसारबंदीची चळवळ आणखी बळकट झाली असती आणि जागतिक अणु व्यापार अधिक सुरक्षित झाला असता, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ताश्कंद येथे बोलताना सांगितले. अण्वस्त्र प्रसारबंदी आणि एनएसजीसोबत सहकार्य करण्याबाबत कोणताही विरोधाभास नसल्याचेही भारताने स्पष्ट केले आहे. सेऊल येथे झालेल्या बैठकीत अनेक सदस्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. ही बाब आणखी पुढे नेण्याचीच भावना या बैठकीत व्यक्त झाली असेही आम्ही समजतो, असेही स्वरूप यांनी सांगितले.
भारतासाठी अपवाद नाही : एनएसजी
आंतरराष्ट्रीय प्रसारबंदीचा भाग म्हणून अण्वस्त्र प्रसारबंदीची पूर्ण आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यावर आपण ठाम असल्याचे एनएसजीने स्पष्ट केले असून, एकप्रकारे भारताला सदस्यत्व मिळावे यासाठी कोणताही अपवाद करणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
एनएसजीच्या दोन दिवसीय बैठकीचा शुक्रवारी समारोप झाला. त्यानंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात हा निर्धार व्यक्त करण्यात आला. मात्र, अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी न केलेल्या देशांना सदस्यत्व मिळण्याबाबत यापुढेही चर्चा सुरूच ठेवणार असल्याचेही या गटाने स्पष्ट केले आहे.
एनएसजीचे सदस्यत्व मिळण्यासाठी भारताने सादर केलेल्या अर्जावर या दोन दिवसीय बैठकीत चर्चा झाल्याचे ‘आऊटरीच’या शीर्षकाखाली प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भारतासोबत नागरी अणु सहकार्य करण्याबाबत २००८ मध्ये जारी करण्यात आलेल्या निवेदनातील सर्व पैलूंवर माहितीचे आदानप्रदान करण्यासह भारताच्या सदस्यत्वाबाबत चर्चा झाली, असेही त्यात म्हटले आहे.
अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी न करणार्‍या देशांना एनएसजीचे सदस्यत्व देण्याबाबतच्या सर्व तांत्रिक, कायदेशीर आणि राजकीय मुद्यांवर यावेळी चर्चा झाली आणि ही चर्चा यापुढेही सुरूच राहाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. गुरुवारी रात्री झालेल्या एनएसजीच्या विशेष बैठकीत भारताच्या अर्जावर सविस्तर चर्चा झाली. दक्षिण कोरियाचे राजदूत सॉंग यूंग वान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांनी सतर्क राहाण्यासह एनएसजीचे कार्य व हेतूबाबत युनोच्या सुरक्षा परिषदेत पारित करण्यात आलेल्या ठरावांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. २०१७ पासून स्वित्झर्लंड एनएसजीचे अध्यक्षपद स्वीकारेल आणि २०१८ ची बैठक आयोजित करेल, असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28777

Posted by on 4:11 pm. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google