richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य » भारताच्या आयटी क्षेत्रातील निर्यातीत १५ टक्के वाढ

भारताच्या आयटी क्षेत्रातील निर्यातीत १५ टक्के वाढ

=रिझर्व्ह बँकेने जाहीर केला २०१४ -१५ तील अनुमान=
RBI-BULDINGनवी दिल्ली, [९ डिसेंबर] – गेल्या वर्षभरात भारतातील आयटी, आयटीएस आणि बीपीओ क्षेत्रातील एकूण निर्यातीमध्ये १४.८ टक्क्यांनी अर्थात ८२ अब्ज डॉलर (५.०१ लाख कोटी रुपये) इतकी वाढ झाली असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे जाहीर करण्यात आले आहे. तसेच अमेरिका आणि कॅनडा या दोन देशांनी संपूर्ण सॉफ्टवेअर सेवा निर्यात क्षेत्रात ६० टक्क्यांचा वाटा उचलला आहे. याशिवाय युरोपने २५ टक्के तर त्यांपैकी निम्मा वाटा इंग्लंडने उचलला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे संगणक सॉफ्टवेअर आणि माहिती तंत्रज्ञानविषयक सेवा निर्यात-२०१४-१५ विषयक एक सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या अहवालात दिलेल्या निष्कर्षानुसार संगणक सेवा आणि आयटीईएस व बीपीओ सेवा क्षेत्राच्या निर्यातीमध्ये यंदा अनुक्रमे ७२ टक्के आणि २८ टक्के इतकी वाढ झाली असल्याचे नोंदवले आहे. यापैकी पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी ५५.६ टक्के इतकी निर्यात केली आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26076

Posted by on 2:40 pm. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google