Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानात शरीफ विरोधी सूर

भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानात शरीफ विरोधी सूर

imran-khanनवी दिल्ली, [२९ सप्टेंबर] – भारताने गुलाम काश्मीरमध्ये बुधवार-गुरुवारच्या रात्री दहशतवाद्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त करण्याचे धाडस दाखवत पाकिस्तानचा अतिरेकी चेहरा जगासमोर आणला. मात्र जनतेच्या भावना शांत करण्यासाठी असा काही हल्ला झालाच नसल्याचे सांगत पाकिस्तान कितीही बचावात्मक राजकारण करीत असला तरी
पाकिस्तानातील अंतर्गत सत्तापिपासू राजकारणाला ऊत आला असल्याचे समजते. भारताने केलेल्या कारवाईसाठी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना विरोधकांनी आता धारेवर धरणे सुरू केले असून त्यात तेहरिक-ए- पाकिस्तान या राजकीय पक्षाचे अध्यक्ष माजी क्रिकेटपटू इम्रान खान आघाडीवर असल्याचे दिसून आले.
शुक्रवारी आपण रावळपिंडी येथे महामोर्चा काढणार असून त्या मोर्चाद्वारे मोदींना कसे उत्तर देता येते, हे आपण शरीफ यांना दाखवून देणार आहोत, असे खान यांनी म्हटले असल्याचे वृत्तआहे.
खरे तर तेहरिक-ए-पाकिस्तान पार्टीचा हा मोर्चा पूर्व नियोजित होता. पण तो होता नवाझ शरीफ यांच्या विरोधात. मात्र आता त्यात एकदम दिशा बदलत खान महोदयांनी तो मोदींच्या विरोधात असल्याचे सांगत स्थानिक राजकारणाला सुरुवात केली आहे.
या मोर्चाच्या माध्यमातून मोदींना उत्तर कसे द्यायचे हे शरीफ यांना दाखवून देणार असल्याने सर्व पाकिस्तानी देशप्रेमींनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन इम्रान खान यांनी केले असल्याचे डॉन या वृत्तपत्राने म्हटले आहे.
मोर्चा काढण्यापेक्षा क्रिकेटपटू या नात्याने तुम्ही मोदींना बाऊन्सर का टाकत नाही? असा खोचक सवालही इम्रान खानला करण्यात आहे. तथापि भारताने दहशतवाद्याविरोधात उचलेल्या पावलामुळे पाकिस्तानात विविध पातळीवर विशेषत: राजकारणात भूकंप आल्याचे जाणवत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29328

Posted by on Sep 30 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (87 of 2458 articles)


नवी दिल्ली, [२९ सप्टेंबर] - भारतीय लष्कराने गुलाम काश्मिरात घुसून केलेल्या धडक कारवाईचे आज येथे आयोजित सर्वपक्षीय बैठकीत स्वागत करण्यात ...

×