Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » भारतातून वर्षाला ५१ अब्ज डॉलर्स बाहेर जातात

भारतातून वर्षाला ५१ अब्ज डॉलर्स बाहेर जातात

=काळा पैसा : यादीत चौथ्या स्थानी, अमेरिकन थिंक टँकचा अहवाल=
GFI-global financial integrityवॉशिंग्टन, [९ डिसेंबर] – परदेशी बँकांमध्ये असलेला काळा पैसा हा भारतात सर्वाधिक चर्चेचा विषय झाला असतानाच २००४ ते २०१३ या कालावधीत भारतातून दरवर्षी तब्बल ५१ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका काळा पैसा बाहेर गेला आणि पैसा बाहेर जाणार्‍या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी आहे, असे अमेरिकास्थित एका थिंकटँकच्या अहवालात म्हटले आहे.
भारताचे संरक्षण अंदाजपत्रकही ५० अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा कमी आहे, हे याठिकाणी उल्लेखनीय. अवैध पैसा बाहेर जाण्याच्या बाबतीत चीन पहिल्या स्थानावर असून, त्या देशातून सरासरी १३९ अब्ज डॉलर्स इतकी रक्कम बाहेर जमा करण्यात येते. त्याखालोखाल रशिया (वार्षिक १०४ अब्ज डॉलर्स) आणि मेक्सिको (वार्षिक ५२.८ अब्ज डॉलर्स) यांचा क्रमांक लागतो, असे ग्लोबल फायनांन्शियल इंटेग्रिटी (जीएफआय) या वॉशिंग्टनस्थित संशोधन आणि सल्लागार संस्थेच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.
करचोरी, गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि इतर अवैध कारवायांच्या माध्यमातून कमावलेला पैसा बेकायदेशीर मार्गाने परदेशात पाठविला जातो. २०१३ या एकाच वर्षात विकसनशील आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधून अवैधपणे १.१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी रक्कम बाहेर नेण्यात आली, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. २००४ ते २०१४ या दशकभरात भारतातून एकूण अर्धा ट्रिलियन (५१० अब्ज अमेरिकन डॉलर्स) इतका पैसा भारताबाहेर गेला, असा जीएफआयचा अंदाज आहे. चीनच्या बाबतीत हा आकडा १.३९ ट्रिलियन आणि रशिया १ ट्रिलियन इतका आहे, असे जीएफआयने ‘इलिसिट फायनान्शियल फ्लोज फ्रॉम डेव्हलपिंग कंट्रीज : २००४-२०१३’, या शीर्षकाखाली प्रकाशित अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26063

Posted by on Dec 9 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1061 of 2458 articles)


=उभय नेत्यांमध्ये दूरध्वनीवरून चर्चा= वॉशिंग्टन, [९ डिसेंबर] - संपूर्ण जगाला भेडसावणार्‍या हवामान बदलाच्या समस्येवर मात करण्यासाठी याच आठवड्यात सक्षम करार ...

×