Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » भारतात दहशतवादी हल्ला झाल्यास युद्धाची शक्यता

भारतात दहशतवादी हल्ला झाल्यास युद्धाची शक्यता

=अमेरिकेच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांचा पाकला इशारा=

नवी दिल्ली, [९ डिसेंबर] – भारतात यानंतर दहशतवादी हल्ला झाला तर दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यता आहे, असा इशारा अमेरिकेचे उपपरराष्ट्र मंत्री ऍण्टोनी ब्लिंकेन यांनी पाकला दिला असून, दहशतवादाचा कठोरपणे मुकाबला करण्याचा सल्ला दिला आहे.
तालिबान आणि लष्कर-ए-तोयबा यासारख्या दहशतवादी संघटनांमध्ये पाकिस्तानने फरक करता कामा नये. मग अशा संघटना पाकमध्ये असतील किंवा बाहेर. अतिरेकी हे अतिरेकीच असतात. मग ते पाक तालिबानचे असो वा लष्कर-ए-तोयबाचा किंवा मग हक्कानी नेटवर्कचा, असे ब्लिंकेन यांनी येथे सांगितले. भारतात जर मोठा दहशतवादी हल्ला झाला तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याचा धोका संभवतो, असा इशाराही त्यांनी दिला.
भारत आणि पाकिस्तान यांनी तणाव कमी करण्यासाठी चर्चा करण्यासह यासाठी अधिक सहकार्य केले पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. दक्षिण आशियात वाढत असलेल्या अण्वस्त्रांच्या संख्येमुळे केवळ भारत आणि पाकिस्तानलाच नव्हे, तर संपूर्ण जगाला धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तानात छोट्या अण्वस्त्रांची संख्या वेगाने वाढली आहे. यावर नियंत्रण आणले गेले नाही, तर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा सध्या भारताच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर असलेल्या ब्लिंकेन यांनी दिला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26079

Posted by on Dec 10 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1051 of 2453 articles)


=रिझर्व्ह बँकेने जाहीर केला २०१४ -१५ तील अनुमान= नवी दिल्ली, [९ डिसेंबर] - गेल्या वर्षभरात भारतातील आयटी, आयटीएस आणि बीपीओ ...

×