Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » भारताने बलुचिस्तानला स्वतंत्र करावे

भारताने बलुचिस्तानला स्वतंत्र करावे

=नाएला कादरी बलोच यांचे मत=
NAILA QADRIनवी दिल्ली, [२ मे] – १९७१ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ज्या प्रमाणे बांगलादेशची निर्मिती केली. त्याप्रमाणे भारताने आता बलुचिस्तानला पाकिस्तानपासून मुक्तता मिळवून देण्याची वेळ आली असल्याचे बलुचिस्तानातील महिला नेत्या नाएला कादरी बलोच यांनी म्हटले आहे.
कॅनडामध्ये कुटुंबियांसह विजनवासात रहात असलेल्या नाएला सध्या भारत भेटीवर आल्या असून, विविध शहरांना भेटी देत आहेत. त्या आपल्या मताला समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वीही बलुचिस्तानातील नेत्यांनी अशीच मागणी केली होती; पण भारताने तिला फारसे गार्ंभीयाने घेतले नाही.
भारत बलुचिस्तानात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप पाकिस्तानने अनेकदा केला आहे. बलूच नेत्या असलेल्या नाएला यांना भारतात येऊन स्वतंत्र, धर्मनिरपेक्ष बलुचिस्तानचा मुद्दा मांडण्याची परवानगी देण्यात आली आहे. बलुचिस्तानमधील लोकांवर पाकिस्तानकडून होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी भारत आणि जगाने या प्रश्‍नामध्ये हस्तक्षेप करून तेथील जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसे न झाल्यास बलूच बंडखोरांना पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारावे लागेल. आतापर्यंत पाकिस्तानकडून हल्ले होत असताना आम्ही फक्त आमचे संरक्षण करत आहोत. पण आम्ही अजून किती काळ वाट पाहायची, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28132

Posted by on May 3 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (396 of 2458 articles)


=केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात जाणार= नवी दिल्ली, [२ मे] - पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांवर बंदी घालण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा, ...

×