Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » भारतासह दहा देश दहशतवादाचे बळी

भारतासह दहा देश दहशतवादाचे बळी

=ग्लोबल टेररिझमच्या २०१४ च्या आकडेवारीतील वास्तव=
terroristन्यूयॉर्क, [१९ नोव्हेंबर] – २०१४ या वर्षात भारतासह दहा देश दहशतवादाचे सर्वाधिक बळी ठरले असून, या काळात जगात दहशतवादी हल्ल्यांमध्ये ठार झालेल्यांपैकी अर्ध्या बळींच्या मृत्यूसाठी इसिस आणि बोको हराम या इस्लामी दहशतवादी संघटना जबाबदार असल्याचे एका नव्या अहवालातून समोर आले आहे.
ग्लोबल टेररिझम इंडेक्स २०१५ च्या (जीटीआय) तिसर्‍या आवृत्तीनुसार २०१४ या वर्षात दहशतवादामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या जगातील १६२ देशांमध्ये भारत ६ व्या स्थानावर आहे. २०१४ या वर्षात भारतात दहशतवादाशी संबंधित मृत्यूंमध्ये १.२ टक्के वाढ झाली आहे. या एकाच वर्षात दहशतवादाने ४१६ जणांचा बळी घेतला असून, २०१० नंतर दहशतवादी घटना आणि बळींची संख्या सर्वांत जास्त असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या काळात ७६३ घटना घडल्या आणि २०१३ च्या तुलनेत ही संख्या २० टक्क्यांनी जास्त आहे, असे वॉशिंग्टनस्थित इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स ऍण्ड पीसच्या अहवालात म्हटले आहे.
२०१४ या वर्षात लष्कर-ए-तोबया व हिजबुल मुजाहिदीन या पाकपुरस्कृत दोन घातक दहशतवादी संघटनांनी भारतात सर्वाधिक कारवाया केल्या. या वर्षात तोयबाने केलेल्या हल्ल्यात २४ जणांना प्राण गमवावे लागले, तर हिजबुलच्या हल्ल्यात ११ जणांचा बळी गेला. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही संख्या ३० ने कमी आहे. २०१३ मध्ये हिजबुल मुजाहिदीन या एकाच संघटनेने भारतात आत्मघाती हल्ल्यांचे धोरण स्वीकारले होते. मात्र, २०१४ या वर्षात भारतात एकही आत्मघाती हल्ला झाला नाही, असेही या अहवालात नमूद आहे. २००० ते २०१४ या कालावधीत भारत तब्बल १४ वेळा दहशतवादाने प्रभावित देशांच्या यादीत पहिल्या दहामध्ये आहे.
२०१४ या वर्षात जगभरात दहशतवादी कारवायांमध्ये बळी गेलेल्यांच्या संख्येत तब्बल ८० टक्क्यांनी वाढ झाली. २०१३ साली १८,१११ लोकांचा मृत्यू झाला होता, तर २०१४ मध्ये तब्बल ३२,६५८ लोकांनी दहशतवादी कारवायांमध्ये आपले प्राण गमावले. या यादीत पाकिस्तान चौथ्या आणि अमेरिका ३५ व्या स्थानावर आहे. इसिस आणि बोको हराम या दोन दहशतवादी संघटनांनी ५१ टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25563

Posted by on Nov 19 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1214 of 2458 articles)


मुंबई, [१९ नोव्हेंबर] - केंद्र सरकारने हाती घेतलेल्या सुधारणांना विरोध आणि निवृत्तीनंतर अधिक लाभ मिळावा, या मागणीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ...

×