Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » भारतीय फौजा दहशतवाद रोखू शकत नाही

भारतीय फौजा दहशतवाद रोखू शकत नाही

=फारूख अब्दुल्लांची बडबड सुरूच=
Farooq-Abdullahनवी दिल्ली, [२८ नोव्हेंबर] – पाकव्याप्त काश्मीर भारताचे नाहीच आणि काश्मीरचा हा भाग भारत पाकिस्तानपासून हिरावू शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी त्यात नवीन भर घातली आहे. भारताच्या सर्व फौजा एकत्र आल्या, तरी त्या पाकच्या सीमेतून होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी रोखू शकत नाही, अशी बडबड त्यांनी केली.
पाकव्याप्त काश्मीर हे पाकचेच आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी युद्ध हा पर्याय असूच शकत नाही, असे वक्तव्य अब्दुल्ला यांनी शुक्रवारी केले होते. आपल्या या मताचे समर्थन करताना, आज शनिवारी त्यांनी थेट भारतीय सशस्त्र दलांच्या क्षमतेवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.
आपल्या शुक्रवारच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, ज्याप्रमाणे पाकव्याप्त काश्मीर आपण बळकावू शकत नाही, त्याचप्रमाणे भारताचा भाग असलेले जम्मू-काश्मीरही पाक बळकावू शकत नाही. मी अशा प्रकारचे वक्तव्य पहिल्यांदा केले नाही. यापूर्वीही मी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाकच्या भूमीतून दहशतवाद्यांची घुसखोरी सुरूच राहणार नाही. भारतीय फौजांनी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली, तरी अतिरेक्यांना थांबविणे शक्य होणार नाही, असे अब्दुल्ला म्हणाले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25810

Posted by on Nov 29 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1124 of 2450 articles)


=९१७ किलो सोन्याची खरेदी= नवी दिल्ली, [२८ नोव्हेंबर] - केंद्र सरकारच्या सुवर्णरोखे योजनेला वाढता प्रतिसाद मिळत आहे. सुरवातीला या योजनेला ...

×