Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » भारतीय वाहिन्यांवर नेपाळमध्ये बंदी

भारतीय वाहिन्यांवर नेपाळमध्ये बंदी

nepal mapकाठमांडू, [२९ नोव्हेंबर] – नेपाळमध्ये पुन्हा एकदा सर्व भारतीय वाहिन्यांचे प्रसारण बंद करण्यात आले आहे. केबल संचालक व डीटीएच संचालकांनी भारतीय चॅनेल्स ‘ऑफ एअर’ करण्याचा निर्णय घेतला. एका परिपत्रकातून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
माओवादी पक्षाच्या एका गटाने भारतातील आर्थिक व्यापाराविरोधात हिंदी चित्रपट, भारतीय चॅनेल बंद करण्याचा निर्णय घेतला. नेपाळमधील मधेश आंदोलनात भारतीय हस्तक्षेप आणि अघोषित नाकाबंदीला विरोध दर्शवत केबल संचालकांनी एकजुटीने ही घोषणा केल्याचे सांगण्यात आले.
सध्या न्यूज चॅनेल ‘ऑफ एअर’ करण्यात आली असून, एन्टरटेनमेंट आणि स्पोटर्‌‌स चॅनलमध्ये सध्या कोणताही अडथळा नाही. हा निर्णय खाजगी असून, नेपाळ सरकारचा त्याशी काहीही संबंध नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25858

Posted by on Nov 30 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1118 of 2455 articles)


=वातावरण बदलावरील परिषदेत सहभागी होणार= नवी दिल्ली, [२९ नोव्हेंबर] - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी वातावरण बदलावरील जागतिक परिषदेत सहभागी ...

×