Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » भारतीय सीमेवर चीनच्या हालचाली वाढल्या

भारतीय सीमेवर चीनच्या हालचाली वाढल्या

=पाकमध्ये स्थापन केले लष्करी तळ=
asian border map india china pakवॉशिंग्टन, [१४ मे] – भारतीय सीमा भागात चीन आपली संरक्षण क्षमता वाढवत असून, जास्तीत जास्त सैनिकही तैनात करीत आहे. शिवाय, पाकिस्तानसह काही देशांमध्येही चीनने आपले लष्करी तळ स्थापन केले आहे. ही स्थिती जगासाठी अतिशय घातक आहे, असा अहवाल अमेरिकन संरक्षण मंत्रालयाने दिला आहे.
भारतीय सीमेला लागून असलेल्या अनेक भागांमध्ये चिनी लष्कराच्या वाढत्या हालचाली आम्ही नमूद केल्या आहेत. तथापि, यामागे चीनचा नेमका काय उद्देश आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे पूर्व आशियाकरिता कामकाज पाहणारे संरक्षण खात्याचे उपमंत्री अब्राहम डेन्मार्क यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रपरिषदेत बोलताना सांगितले. चीनच्या लष्करी व सुरक्षा हालचालींवरील यंदाचा अहवाल अमेरिकन कॉंगे्रसला सादर केल्यानंतर ते बोलत होते.
चीनच्या या हालचालींचा अमेरिकेच्या अंतर्गत व्यवहारावर काय परिणाम होऊ शकतो, तसेच बाह्य सुरक्षा किती धोक्यात येऊ शकते, याबाबतचा ठोस निष्कर्ष काढणे आताच शक्य होणार नाही. एवढे मात्र खरे की, भारतीय सीमाभागात आपल्या लष्करी कारवाया वाढवितानाच चीनने तिबेटमध्येही आपले लष्करी कमांड अद्ययावत केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
म्हणूनच अद्ययावत अण्वस्त्रे
अमेरिका, रशिया आणि भारताने आपल्या संरक्षण क्षमतेत प्रचंड वाढ केल्यामुळेच चीननेही आपल्या अण्वस्त्रांना अद्ययावत करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. आपली मारक क्षमता वाढविणे हाच त्यामागील उद्देश असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28239

Posted by on May 15 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (356 of 2458 articles)


मुंबई, [१४ मे] - बदलत्या जीवनशैलीत टीव्हीचा मोठा परिणाम बालमनावर होत असून ९७ टक्के मुले टीव्हीच्या जाळ्यात अडकल्याचे वास्तव टर्नस ...

×