Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » भारत अमेरिकेकडून घेणार १०० ड्रोन्स

भारत अमेरिकेकडून घेणार १०० ड्रोन्स

=ड्रॅगनचा बंदोबस्त करणार=
Drone_Firingवॉशिंग्टन, [२२ डिसेंबर] – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या सैनिकांकडून वारंवार होत असलेली घुसखोरी आणि पाकिस्तानी सैनिकांच्या वाढत्या भारतविरोधी कारवायांना चीनकडून मिळत असलेले समर्थन या सर्वच घटकांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी भारताने अमेरिकेकडे टेहळणी आणि शस्त्रसज्ज १०० ड्रोन्स मागितले असून, ते लवकरच भारताच्या भात्यात सहभागी होणार आहेत. हे १०० ड्रोन्स खरेदी करण्यासाठी भारताला दोन अब्ज डॉलर्स इतका खर्च येणार आहे.
भारत आणि अमेरिकेदरम्यान या मुद्यावर अतिशय उच्च पातळीवर चर्चा सुरू आहे. चीनसोबतच पाकिस्तानचाही धोका परतावून लावण्यासाठी भारताने अत्याधुनिक अशा ऍव्हेंजर ड्रोन्सची मागणी अमेरिकेकडे केली आहे.
भारत-चीनला विभाजणार्‍या सीमारेषेवर गस्त घालण्याच्या उद्देशाने हे ड्रोन्स अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. या ड्रोन्ससोबतच सीमेवर टेहळणी करण्यासाठी ‘प्रिडेटर एक्सपी’ या जातीची विमाने खरेदी करण्यासाठीही भारत उत्सुक आहे. देशांतर्गत सुरक्षा धोरण व दहशतवादी हल्ल्यांविरोधातील उपाययोजनांमध्ये ‘प्रिडेटर’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते, अशी माहिती या घडामोडीशी संबंधित उच्चस्तरीय सूत्राने दिली.
या संदर्भात भारत आणि अमेरिकेत चर्चा सुरू आहे. ड्रोन्सच्या खरेदीवर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले असले, तरी प्रिडेटर विमानांबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या प्रसारासंदर्भातील आंतरराष्ट्रीय संघटना असलेल्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण संघटनेतील प्रवेशासंदर्भात भारताने केलेला अर्ज अजूनही प्रलंबित आहे. तथापि, भारताच्या सागरी हद्दीत गोळीबार केलेल्या इटलीच्या नौदल कर्मचार्‍यांना अटक करण्यात आल्यानंतर इटलीने हा प्रश्‍न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला आहे. यामुळे ही विमाने देण्यासंदर्भात अमेरिकेने भारताला ठोस आश्‍वासन दिले नाही. पण, आगामी काही महिन्यातच या विमानांच्या खरेदीचा मार्ग मोकळा झालेला असेल, असे संकेत दोन्ही देशांच्या सूत्राने दिले आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26271

Posted by on Dec 23 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (987 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२२ डिसेंबर] - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रतिबॅरेल ३६ डॉलर्सपेक्षाही खाली आल्या असल्याने नववर्षाच्या सुरुवातीलाच देशात पेट्रोल ...

×