richwood
richwood
richwood
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » भारत गुप्तपणे उभारतोय् आण्विक शहर

भारत गुप्तपणे उभारतोय् आण्विक शहर

=परराष्ट्र धोरण विषयक जर्नलचा दावा=
atomic_cityवॉशिंग्टन, [१७ डिसेंबर] – अण्वस्त्रसंपन्न होण्यासाठी भारत गुप्तपणे एक आण्विक शहर उभारत आहे, जेणेकरून आण्विक महासत्ता होऊन पाकिस्तान व चीन या दोन शेजारी देशांना अस्थिर करता येईल, असा खळबळजनक दावा एका आघाडीच्या अमेरिकन परराष्ट्र धोरण विषयक जर्नलने केला आहे.
कर्नाटकच्या चल्लाकेरे येथे हे गुप्त आण्विक शहर उभारण्यात येत असून, २०१७ मध्ये पूर्ण झाल्यानंतर लष्कराकडून संचालित केले जाणारे आणि सेंट्रीफ्यूज, अणुसंशोधन प्रयोगशाळा, शस्त्रास्त्र आणि विमानचाचणीची क्षमता असलेले उपखंडातील सर्वांत मोठे केंद्र होईल, असे यासंबंधीच्या वृत्तात म्हटले आहे. याशिवाय थर्मोन्यूक्लिअर अर्थात हायड्रोजन बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारा युरेनियमचा साठा करण्याची देखील भारताची वादग्रस्त महत्त्वाकांक्षा आहे, असे लंडन व वॉशिंग्टन येथील निवृत्त भारतीय अधिकारी व स्वतंत्र तज्ज्ञांच्या हवाल्याने देण्यात आलेल्या शोध वृत्तात म्हटले आहे.
चीन आणि पाकिस्तान हे भारताचे दोन शेजारी देश याकडे चिथावणी म्हणून बघतील आणि यामुळे दोन्ही देश आपली आण्विक क्षमता वाढवून त्याला प्रतिसाद देतील, असे तज्ज्ञांचे मत असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. या वृत्ताला भारत किंवा अमेरिकन सरकारकडून कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही. परंतु, हे वार्तांकन करताना अनेक अज्ञात अधिकारी आणि निवृत्त सरकारी अधिकार्‍यांचा हवाला मात्र अवश्य देण्यात आला आहे. म्हैसूरवर आमचे बारीक लक्ष आहे आणि चल्लाकेरे येथील प्रगतीवरही आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे व्हाईट हाऊसच्या एका माजी अधिकार्‍याने सांगितल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. चल्लाकेरे हे म्हैसूरजवळच आहे, हे विशेष.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26205

Posted by on 4:32 pm. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google